श्री. अरविंद कुलकर्णी यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

श्री. अरविंद कुलकर्णी

१. सेवेला जातांना वेळेचे काटेकोरपणे पालन आणि तळमळ

 

दैनिक वितरणाच्या सेवेसाठी मूळचे वडूज (जि. सातारा) येथील आणि आता रामनाथी आश्रमात रहाणारे श्री. अरविंद कुलकर्णीकाका (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ८३ वर्षे) बसस्थानकावर बस येण्याच्या वेळेच्या १५ मिनिटे अगोदर आलेले असायचे. काकांचे वय अधिक असूनही ते प्रतिदिन १५ ते २० दैनिकांचे अंक एकटे चालत वितरण करायचे.

२. गुरुसेवेची तळमळ

दैनिक ‘सनातन प्रभात’चे गठ्ठे बसने यायचे. त्यासाठी मासिक पास असायचा. त्यामुळे महिना पूर्ण होण्याच्या २ दिवस अगोदर कुलकर्णीकाका मला आठवण करून द्यायचे. ‘महिना संपत आला आहे’, तसेच जर काही कारणाने पास लवकर मिळाला नाही, तरी पाठपुरावाही घ्यायचे.

३. इतरांना समजून घेणे

त्यांनी एवढ्या वयातही तळमळीने, शांत आणि स्थिर राहून, परिस्थितीशी जुळवून घेऊन, तसेच कधीच कुणाला न दुखवता दैनिक वितरणाची सेवा केली. काका सेवेसाठी असल्याने अन्य वितरक साधकांना कोणतीही काळजी वाटत नसे. ‘कुलकर्णीकाका आहेत. मग काही अडचण येणार नाही’, असे सर्वांना वाटायचे. सर्वांना त्यांचा आधार वाटायचा.

४. अनेक गुणांचा समुच्चय असणारे कुलकर्णीकाका !

दैनिक वितरणाच्या सेवेतून काकांनी सर्व साधकांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. मला त्यांच्याकडून ‘इतरांचा विचार, सेवेची तळमळ आणि भाव-भक्ती’, असे विविध गुण शिकायला मिळाले.’

– श्री. दीपक गोडसे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१४.३.२०२४)