Pakistani Hindu MPs Desperation : एक दिवस आपल्याला पाकिस्तानातून हिंदूंचा अंत झालेला दिसेल !

पाकिस्तानच्या संसदेत हिंदु खासदार दानेश कुमार पलयानी यांनी व्यक्त केली हतबलता !

पाकिस्तानच्या संसदेत हिंदु खासदार दानेश कुमार पलयानी

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानमध्ये हिंदूंच्या मुलींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर केले जात आहे. तुम्ही (सभापती) काहीतरी करा, नाहीतर एक दिवस येथून हिंदूंचा अंत झालेला दिसेल, असे कळकळीचे आवाहन पाकिस्तानातील हिंदु खासदार दानेश कुमार पलयानी यांनी पाकिस्तानच्या संसदेत केले.

दानेश कुमार पलयानी यांनी मांडलेली सूत्रे –

• पवित्र कुराण म्हणतो, ‘धर्मात कसलीही सक्ती नाही !’

सिंधमध्ये कट्टर डाकू आमच्या हिंदु मुलींना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडत आहेत. कच्चे डाकू केवळ अपहरण करतात. ‘कुणालाही बलपूर्वक धर्मांतरित करता येणार नाही’, असे पाकिस्तानच्या घटनेत म्हटले आहे. पवित्र कुराण म्हणतो, ‘धर्मात कसलीही सक्ती नाही. तुमचा धर्म तुमच्यासाठी, आमचा धर्म आमच्यासाठी.’ त्यामुळे या क्रूर लोकांचा ना पाकिस्तानच्या राज्यघटनेवर विश्‍वास आहे, ना कुराणावर. ते बलपूर्वक आमच्या हिंदु मुलींचा धर्म पालटतात.

• ६ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण

सुफी पंशामध्ये महत्त्वाचे लोक हिंदू होते, तरीही त्यांनी कोणत्याही शक्तीचा वापर केला नाही. मोहरमच्या महिन्यात ६ वर्षांची प्रिया कुमारी हिचे संगर येथून अपहरण करण्यात आले. तिचे आई-वडील लोकांना पाणी देत होते. या घटनेला आता २ वर्षे झाली; पण प्रियाचा अद्याप शोध लागलेला नाही. अपहरण करणार्‍या व्यक्तीचे नाव सर्वांना ठाऊक आहे. तोही कट्टर डाकू आहे; पण सिंध सरकार आम्हाला साहाय्य करत नाही. त्या माणसाला अटक केली पाहिजे, जेणेकरून प्रिया मुक्त होईल. या प्रकरणी संयुक्त अन्वेषण पथक स्थापन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. प्रिया कुमारीचे अपहरण करणार्‍यांना वातानुकूलित खोलीत बसवून त्यांची चौकशी केली जाते. हा अन्याय आहे. या प्रकरणांमुळे आमचे शत्रू देश माझ्या जन्मभूमीकडे बोट दाखवत आहेत.

• मुसलमानेतर लोक कुणावरही अत्याचार करत नाहीत !

सिंधने बलुचिस्तानकडून शिकले पाहिजे. बलुचिस्तानमध्ये अत्याचार होत नाहीत. पाकिस्तानची राज्यघटना अनुमती देते की, येथे जो कुणी असेल, तो धर्माचे पालन करू शकतो. येथे मुसलमानेतर लोक कुणावरही अत्याचार करत नाहीत.


हे ही वाचा – Pakistan Hindu Girls Conversion : पाकिस्तानमध्ये हिंदु मुलींचे बलपूर्वक धर्मांतर – मानवाधिकार संघटनांनी हस्तक्षेप करण्याची सिंधच्या राष्ट्रवादी नेत्याची मागणी !


संपादकीय भूमिका

  • जे भविष्यात घडणार आहे, तेच खासदार दानेश कुमार पलयानी यांनी सांगितले आहे. यावर पाकिस्तानी राज्यकर्ते हिंदूंच्या रक्षणासाठी काही करतील, याची शक्यता नाहीच !
  • जोपर्यंत भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होत नाही, तोपर्यंत भारतातील आणि विदेशातील, विशेषतः इस्लामी देशांतील हिंदूंचे रक्षण होणार नाही, हीच वस्तूस्थिती आहे !