Pakistan Hindu Girls Conversion : पाकिस्तानमध्ये हिंदु मुलींचे बलपूर्वक धर्मांतर – मानवाधिकार संघटनांनी हस्तक्षेप करण्याची सिंधच्या राष्ट्रवादी नेत्याची मागणी !

कराची (पाकिस्तान) – ‘सिंध फ्रीडम मूव्हमेंट’चे अध्यक्ष तथा सिंधचे राष्ट्रवादी नेते सोहेल अब्रो यांनी पाकिस्तानमध्ये हिंदु मुलींच्या करण्यात येणार्‍या बलपूर्वक धर्मांतराचा निषेध केला आहे. दोन वर्षांपूर्वी सिंधमधून बेपत्ता झालेल्या प्रिया कुमारी या हिंदु मुलीच्या सुरक्षित सुटकेसाठी हस्तक्षेप करण्याचे आवाहन अब्रो यांनी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांना केले आहे.

पाकिस्तानातील आतंकवाद्यांच्या प्रभावाखाली सिंधी हिंदु मुलींचे बलपूर्वक धर्मांतर करून त्यांचे मुसलमान पुरुषांशी विवाह लावला जात आहे. मियाँ मिथू यांच्यासारखे आतंकवादी हिंदु मुलींवर उघडपणे अत्याचार करत असून त्यांचे बलपूर्वक धर्मांतर करतात आणि त्यांचे मुसलमान पुरुषांशी विवाह लावून देतात, असा आरोप अब्रो यांनी केला आहे. अशा अत्याचारी कृत्यांचा आरोप असलेल्या व्यक्तींची बाजू घेत असल्याविषयी त्यांनी न्यायव्यवस्थेवरही टीका केली आहे आणि प्रिया कुमारीसारख्या पीडित हिंदु मुलींना न्याय देण्याची मागणी केली आहे.


हे ही वाचा – Pakistani Hindu MPs Desperation : एक दिवस आपल्याला पाकिस्तानातून हिंदूंचा अंत झालेला दिसेल !

संपादकीय भूमिका

पाकिस्तानमधील हिंदूंच्या मूळावर उठलेला‘लव्ह जिहाद’ आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि साम्यवादी प्रसारमाध्यमे यांना दिसत नाही का ?