पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांचे बस्तान बसवण्याचा कट शिजत आहे का ?

आतापर्यंत महाराष्ट्रात ३ शहरांत अल्पवयीन मुसलमान मुलांना पकडले !

बिहार राज्यातून कोल्हापूर जिल्ह्यात जाणार्‍या ३२ अल्पवयीन मुसलमान मुलांना मिरज रेल्वे पोलिसांनी २४ एप्रिल या दिवशी धनबाद एक्सप्रेस रेल्वेतून कह्यात घेतले. अशी घटना यापूर्वी कोल्हापूर, भुसावळ आणि मनमाड येथेही घडल्या आहेत. त्यामुळे या माध्यमातून म्यानमारमधील घुसखोर रोहिंगे आणि घुसखोर बांगलादेशी मुसलमानांचा महाराष्ट्रात बस्तान बसवण्याचा घाट घातला जात आहे का ? अशी शंका नागरिकांतून उपस्थित केली जात आहे.

२४ एप्रिल या दिवशी धनबाद-कोल्हापूर एक्सप्रेस रेल्वे मिरज रेल्वेस्थानकावर आल्यानंतर पडताळणी वेळी एका डब्यात ३२ अल्पवयीन मुसलमान मुले आढळून आली. त्यामुळे संशय आला. त्यांना कह्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्यासमवेत पालक नव्हते. चौकशीत ही मुले कोल्हापूर जिल्ह्यातील एका संस्थेत जाणार असल्याचे समोर आले. रेल्वे पोलिसांनी ‘बालकल्याण समिती’ला याची माहिती दिली. ते ‘चाईल्ड लाईन’च्या साहाय्याने स्थानकावर आले. सध्या या मुलांसह संबंधितांची चौकशी चालू आहे.

श्री. सचिन कौलकर, सांगली

प्रातिनिधिक छायाचित्र

कोल्हापूर येथे ६९ अल्पवयीन मुसलमान मुले आढळली !

१७ मे २०२३ या दिवशी कोल्हापूर येथील रुईकर कॉलनी येथे एका ट्रकमध्ये ६९ अल्पवयीन मुसलमान मुले आढलून आली होती. कुणीतरी ही गोष्ट पोलिसांना सांगितल्यावर पोलिसांनी या सर्व मुसलमान मुलांना कह्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता ही मुले आजरा येथील एका मदरशामध्ये धार्मिक शिक्षण घेण्यासाठी जात असल्याचे समजले. ही सर्व मुले उत्तरप्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल राज्यांतून आल्याचेही या वेळी केलेल्या चौकशीतून स्पष्ट झाले होते.

भुसावळ-मनमाड येथेही ५९ अल्पवयीन मुसलमान मुले मिळाली !

श्री. सचिन कौलकर

३१ मे २०२३ या दिवशी बिहारमधून सुटणार्‍या दानापूर-पुणे एक्सप्रेसमधून प्रवास करणारी ५९ अल्पवयीन मुसलमान मुले रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलीस यांना मिळाली होती. त्यांपैकी ३८ मुसलमान मुलांना रेल्वे पोलिसांनी भुसावळ येथे, तर २१ मुलांना मनमाड येथे कह्यात घेतले होते. त्यांच्यासमवेत प्रवास करणार्‍या ४ मुसलमानांनाही कह्यात घेण्यात आले होते. ही मुले आणि संबंधितांकडे केलेल्या चौकशीत ५९ पैकी ४० मुले ही पिंपरी-चिंचवड येथील मदरशात, तर १९ मुले सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथील मदरशात धार्मिक शिक्षणासाठी निघाली होती. ही मुलेही मूळची उत्तरप्रदेश आणि बिहार येथील होती. या सर्व घटनांतील समान गोष्ट म्हणजे बहुतांश मुले उत्तरप्रदेश, बंगाल आणि बिहारशी संबंधित आहेत.

पोलिसांचे या घटनांकडे दुर्लक्ष, अन्वेषणही अपूर्ण !

विशेष म्हणजे वरील सर्व घटनांची पोलिसांनी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करणे अपेक्षित होते; मात्र पोलिसांनी या घटनांची सखोल चौकशी केलीच नाही. कोल्हापूर येथे अल्पवयीन मुले सापडल्यानंतर पोलिसांनी सखोल अन्वेषण करून दोषींवर कारवाई केली असती, तर पुन्हा अशा घटना घडल्या नसत्या; मात्र पोलीस केवळ चौकशी करून सोडून देतात का ? असा प्रश्न नागरिकांना पडतो.

रोहिग्यांची घुसखोरी अशी…

१. जगातील सर्वांत मोठा राष्ट्रविहिन समाज म्हणून रोहिंग्या ओळखले जातात. देशात बहुतांश राज्यांत घुसखोर बांगलादेशी मुसलमानांचे बस्तान आहे.

२. केंद्रशासनाच्या वर्ष २०२१ च्या आकडेवारीनुसार भारतातील रोहिंग्या घुसखोरांची संख्या १८ ते ४० सहस्र आहे.

३. बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांनी घुसखोरीसाठी राज्यात मदरशांचा आसरा घेतल्याचा संशय आहे.

देशासाठी घातक असलेले रोहिंग्या मुसलमान !

रोहिंग्या मुसलमान समाज हा पश्चिम म्यानमारमधील अरकान प्रांतातील आहे. जगभरात यांची संख्या २० लाखांहून अधिक आहे. म्यानमारमध्ये यांची संख्या १३ लाखांच्या आसपास आहे. वर्ष २०१७ च्या ऑगस्टमध्ये म्यानमारमधील काही सुरक्षा चौक्यांवर झालेल्या सशस्त्र आक्रमणात ‘अरकान रोहिंग्या साल्व्हेशन आर्मी’चा हात असल्याचा संशय आहे. राखिंगे प्रांतातील रोहिंग्या मुसलमानांना म्यानमार सैन्याने हुसकावून लावले. यामुळे अनुमाने ३-४ लाख रोहिंग्या मुसलमान निर्वासितांचे लोंढे शेजारी देशांमध्ये घुसले, तसेच तेथील काही मुसलमान भारतातही आले.