नवी मुंबई – नेरूळ येथे मागील १७ वर्षांपासून बेकायदेशीररित्या वास्तव्य करणार्या बांगलादेशी कुटुंबातील तिघांना अटक केली आहे. या प्रकरणी त्यांच्या विरुद्ध पारपत्र (भारतात प्रवेश) आणि विदेशी व्यक्ती अधिनियम तसेच बनावट कागदपत्र बनवल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
१. लोकसभा निवडणुकीच्या निमित्त नेरूळ पोलिसांचे पथक गस्त घालत असतांना सेक्टर १५ मधील जामा मशिदीजवळ एक बांगलादेशी नागरिक अवैधरित्या व्यवसाय करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
२. त्यानुसार पोलिसांनी तेथून अब्दुल सबुर अब्दुल सुबान शेख (५५) याला कह्यात घेतले. त्याची चौकशी केली असता तो पत्नी आणि मुलीसह त्याच भागात रहात असल्याचे सांगितले.
३. यानंतर पोलिसांनी एन्एल् टाईप इमारतीमधून त्याची पत्नी तेहमिना अब्दुल सबुर शेख (४२) आणि त्यांची मुलगी हलिमा अब्दुल सबुर शेख (२१) यांना अटक केली. त्यांनी कोणत्याही कायदेशीर प्रवासी कागदपत्राविना घुसखोरीच्या मार्गाने बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केल्याचे निष्पन्न झाले.
४. ते मागील १७ वर्षांपासून भारतात रहात असून त्यांनी बनावट कागदपत्राच्या आधारे आधारकार्ड आणि पॅनकार्ड बनवल्याचे आढळून आले आहे. (प्रशासनात देशघातकी मनोवृत्तीचे लोक असल्यामुळेच घुसखोरांचे फावते. अशांवर प्रथम कारवाई करणे आवश्यक ! – संपादक)
संपादकीय भूमिकाबांगलादेशी घुसखोर नवी मुंबईपर्यंत पोचतात, याचा अर्थ भारताच्या अंतर्गत सुरक्षायंत्रणेत किती त्रुटी आहेत, हे लक्षात येते. अशाने घुसखोरीची समस्या कशी सुटणार ? |