कोची (केरळ) – एर्नाकुलम् येथील मट्टलिल मंदिरात १९ एप्रिल या दिवशी ‘धर्माचरणाचे महत्त्व’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रवचन घेण्यात आले. मट्टलिल मंदिरात ‘मकम् नक्षत्रा’च्या कारणास्तव काही महिलांनी एकत्र येऊन स्तोत्र पठण केले. त्यानंतर समितीच्या कु. अदिती सुखटणकर यांनी ‘धर्म म्हणजे काय ? धर्माचरणाचे महत्त्व’, यांविषयी सांगितले.
क्षणचित्र :
१. काही महिलांनी सनातनच्या सात्त्विक उत्पादनांच्या कक्षावरील ‘सनातन कुंकू’चे महत्त्व समजून घेऊन ते विकत घेतले.
२. मंदिरातील अधिकार्यांनी प्रवचनाचे छायाचित्र घेतले आणि ते मंदिराच्या व्हॉट्सॲप गटाद्वारे समाजात प्रसारित केले.