अयोध्येत प्राणप्रतिष्ठा केलेल्या श्री रामलल्लाच्या मूर्तीची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

आज १७ एप्रिल (चैत्र शुक्ल नवमी) या दिवशी असलेल्या श्रीरामनवमीच्या निमित्ताने…

१६.४.२०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘श्री रामलल्लाच्या ५ वर्षे वय असलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव, तसेच मूर्तीच्या बाजूने केलेल्या कलाकृतीची आध्यात्मिक वैशिष्ट्ये’ पाहिली. आजच्या उर्वरित लेखातून आपण ‘प्राणप्रतिष्ठा होण्यापूर्वी आणि झाल्यानंतर श्री रामलल्लाच्या मूर्तीमध्ये जाणवलेला भेद, तसेच मूर्तीतून प्रक्षेपित होणार्‍या घटकांमुळे भाविकांना येणार्‍या अनुभूती’ पाहूया. 

डावीकडून श्रीरामलल्लाची मूर्ती (प्राणप्रतिष्ठापना करण्यापूर्वी) आणि श्रीरामलल्लाची मूर्ती (प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर)

भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/784488.html

(भाग २)

३. श्रीरामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यापूर्वी आणि केल्यानंतर मूर्तीच्या संदर्भात जाणवलेली आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये

टीप १ – श्री रामलल्लाच्या व्यष्टी प्रकृतीच्या भक्तांमुळे त्याच्या मूर्तीमध्ये अधिकाधिक प्रमाणात श्रीरामाचे तत्त्व आकृष्ट होत आहे, तर त्याच्या समष्टी प्रकृतीच्या भक्तांमुळे त्याच्या मूर्तीतून अधिकाधिक प्रमाणात श्रीरामाचे तत्त्व पृथ्वीच्या वायूमंडलात प्रक्षेपित होत आहे.

सुश्री (कु.) मधुरा भोसले

टीप २ – यावरून हे सूत्र लक्षात येते की, कोणत्याही देवतेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यामुळे तिच्यातील सजीवपणा वाढून तिच्यातील गोडवाही वाढतो. त्यामुळे भाविकांना देवतेची मूर्ती जागृत असल्याच्या अनुभूती येतात.

४. श्री रामलल्लाच्या विविध कुंडलिनी नाड्या जागृत होणे

भाविकांचा भाव आणि त्यांची आवश्यकता यांनुसार श्री रामलल्लाच्या मूर्तीच्या विविध कुंडलिनी नाड्या विविध वेळी जागृत होतात.

५. श्री रामलल्लाच्या मूर्तीतून प्रक्षेपित होणार्‍या घटकांमुळे भाविकांना येणारी अनुभूती आणि त्यांना होणारा लाभ

सर्वार्थाने आदर्श असणार्‍या प्रभु श्रीरामाच्या बालरूपातील श्री रामलल्लाच्या मूर्तीची आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि मूर्तीतून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी होणारे सूक्ष्मातील कार्य यांचे ज्ञान दिल्याबद्दल मी श्रीगुरुचरणी अनन्यभावाने कृतज्ञता व्यक्त करते.’

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.२.२०२४)

(क्रमशः)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक