Ranchi Stones On Roofs : रांची (झारखंड) येथे श्रीरामनवमी निमित्तच्या मिरवणुकीच्या मार्गावरील १० घरांच्या छतांवर आढळला दगडांचा साठा !

रांची (झारखंड) – येथे उद्या, म्हणजे १७ एप्रिल या दिवशी श्रीरामनवमीनिमित्त मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणूक ज्या भागांतून जाणार आहे, त्या भागांवर ड्रोन कॅमेर्‍यांद्वारे लक्ष ठेवण्यात येत असतांना मेनरोड, लेक रोड आणि हिंदपिरी येथील १० घरांच्या छतांवर मोठ्या संख्येने दगड गोळा करून ठेवण्यात आल्याचे दिसून आले. पोलिसांनी या १० घरांच्या मालकांना नोटीस बजावली असून ‘घराच्या छतांवर ठेवलेले दगड तात्काळ हटवावेत’, असे म्हटले आहे. ते न हटवल्यास शहरात कोणत्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास आणि त्या दगडांचा वापर होत असल्याचे आढळून आल्यास संबंधित घरावर थेट कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी चेतावणीही देण्यात आली आहे. ज्या भागांत दगड किंवा संशयास्पद वस्तू आढळल्या, त्या ठिकाणी अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात येत आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी दिली.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार दंगल झाली, तर त्या घरांची स्थिती ड्रोनच्या माध्यमातून पुन्हा पाहिली जाईल. दंगलीच्या काळात दगडांची संख्या अल्प झाली, तर येथील दगड दंगलीत वापरण्यात आले असावेत, असे मानले जाईल.

संपादकीय भूमिका

झारखंड पोलिसांनी मिरवणुकीपूर्वी अशा प्रकारचा शोध घेतला, यासाठी त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. पोलिसांनी आता संबंधितांच्या घरांवर बुलडोजर फिरवले पाहिजे, तरच त्यांच्यावर वचक बसेल, असेच जनतेला वाटते !