सनातन प्रभात > Post Type > चौकटी > साधनाविषयक चौकट > साधकांनो, ‘एकटे रहाण्याचे विचार येणे’, हे आध्यात्मिक त्रास वाढल्याचे लक्षण असून त्रास न्यून होण्यासाठी परिणामकारक उपाय करा !
साधकांनो, ‘एकटे रहाण्याचे विचार येणे’, हे आध्यात्मिक त्रास वाढल्याचे लक्षण असून त्रास न्यून होण्यासाठी परिणामकारक उपाय करा !
‘व्यक्तीचा आध्यात्मिक त्रास वाढला की, तिला एकटे रहाण्याचे विचार येतात आणि तिचे इतरांमध्ये मिसळणे न्यून होऊ लागते. ‘एकटे रहाण्याचे विचार येणे’, हे आध्यात्मिक त्रासाचे लक्षण आहे. हे लक्षात घेऊन त्रास न्यून होण्यासाठी साधकांनी ‘सत्मध्ये रहाणे, नामजपादी आध्यात्मिक उपाय करणे, सत्सेवा करणे’, आदी प्रयत्न वाढवावेत. हे प्रयत्न सातत्याने आणि परिणामकारक रीतीने केल्यास हळूहळू त्यांचा त्रास कमी होऊ लागतो !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.