अधिकाचा असलेला हव्यास मनातून निघून गेल्यास अधिकचे दान केल्याने अपरिग्रह घडेल !


‘थोडा वेळ प्रत्येकाने असा विचार केला, ‘माझी गरज भागल्यानंतर अधिकाने मला अधिक देहसुखसाधने मिळतील; पण त्यामुळे कोण्यातरी गरजवंताला भुकेला ठेवून मी त्याच्यावर अन्यायच करत नाही का ?’ असे खरोखरच प्रत्येकाला आतून वाटले, तर अधिकाचा असलेला हव्यास मनातून निघून जाईल. सहजपणे ‘माझ्या कष्टातून मिळालेला पैसा जर आवश्यकतेपेक्षा अधिक असेल, तर तोदेखील दानधर्मात खर्च करावा’, असेच स्वाभाविकपणे मला वाटू लागेल. हाच अपरिग्रह.
– स्वामी विद्यानंद (साभार : ग्रंथ ‘चिंतनधारा’)