‘कॅनडात अल्पसंख्याकांच्या अधिकारांचे रक्षण करू !’ – जस्टिन ट्रूडो, पंतप्रधान, कॅनडा

जस्टिन ट्रूडो

ओटावा (कॅनडा) –  कॅनडाच्या निवडणुकीत परकीय हस्तक्षेप झाला, असा  आरोप होत आहे. पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी यासंबंधीच्या ‘परदेशी हस्तक्षेप आयोगा’समोर सार्वजनिक सुनावणीत साक्ष दिली. गेल्या २ निवडणुकांमध्ये परकीय हस्तक्षेपाचे आरोप त्यांनी फेटाळून लावले. वर्ष २०१९ आणि वर्ष २०२१ च्या निवडणुकीत भारताने हस्तक्षेप केल्याचा आरोप कॅनडाच्या प्रसारमाध्यमांनी केला होता; मात्र भारताच्या हस्तक्षेपाचा कोणताही पुरावा नसल्याचे कॅनडाच्या गुप्तचर अहवालात म्हटले आहे. उलट चीनकडून हस्तक्षेप झाल्याचे गुप्तचर अहवालात म्हटले आहे. तरीही या सुनावणीच्या वेळी ट्रुडो यांनी भारत आणि आतंकवादी हरदीपसिंह निज्जर याच्या मृत्यूचा उल्लेख करण्यात आला. जस्टिन ट्रूडो यांनी या वेळी  सांगितले की, त्यांचे कॅनडातील अल्पसंख्य जरी त्यांच्या मूळ देशांना अस्वस्थ करीत असले, तरी त्यांच्या अधिकारांचे रक्षण करण्यावर आम्ही ठाम आहोत. (एकप्रकारे कॅनडातील खलिस्तानी आतंकवाद्यांचे समर्थन करणारे ट्रुडो यांना समजेल अशा भाषेत भारताने प्रत्युत्तर द्यावे ! – संपादक)

सौजन्य Kinjal Choudhary

१. गेल्या वर्षी जूनमध्ये खलिस्तान समर्थक आतंकवादी हरदीपसिंह निज्जर याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. जस्टिन ट्रूडो यांनी हरदीपसिंह निज्जरच्या हत्येच्या मागे भारताचा हात असल्याचा आरोप केला होता. भारताने हे आरोप फेटाळून लावले होते.

२. ट्रूडो म्हणाले, ‘आमचे तत्त्व हे आहे की, जो कोणी जगाच्या पाठीवरून कॅनडामध्ये येतो त्याला कॅनडाचे सर्व अधिकार आहेत. आम्ही अशांच्या पाठीशी कसे उभे रहातो, हे निज्जर यांच्या हत्येच्या गंभीर प्रकरणात दिसून आले आहे.

संपादकीय भूमिका 

कॅनडात सत्तेत रहाण्यासाठी तेथील खलिस्तानवाद्यांना चुचकारण्याचा ट्रुडो यांचा डाव त्यांच्याच अंगलट येणार, हे निश्‍चित !