Tamil Nadu IT Raid : तमिळनाडूत ‘पोल्ट्री फार्म’वरील धाडीमध्ये मिळाले ३२ कोटी रुपये !

निवडणुकीत मतदारांना वाटण्यासाठी जमा केल्याचा संशय

कोईम्बतूर (तमिळनाडू) – आयकर विभागाने एका ‘पोल्ट्री फार्म’वर छापा घालून ३२ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. ‘हे पैसे मतदारांना वाटण्यासाठी म्हणून जमा केले असावेत’, असा पोलिसांना संशय आहे. या ‘पोल्ट्री फार्म’चे मालक अरुण मुरुगन आणि श्रवण मुरुगन हे दोघे असून राज्यभरात त्याच्या अनेक शाखा आहेत.