आतापर्यंत १० जणांना अटक
थिरूवनंतपूरम् (केरळ) : केरळमधील मुवट्टुपुझा येथे जमावाने अशोक दास या परप्रांतीय कामगाराला खांबाला बांधून बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना ३ दिवसांपूर्वी घडली. याप्रकरणी पोलिसांनी १० जणांना अटक केली आहे. अशोक अरुणाचल प्रदेशातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. तो या परिसरात रहाणार्या एका मैत्रिणीला भेटण्यासाठी गेला होता. यानंतर स्थानिक लोकांनी प्रथम त्याची विचारपूस केली आणि नंतर त्याला खांबाला बांधून बेदम मारहाण केली.