US Warn Israel : तात्काळ युद्ध थांबवा अन्यथा पाठिंबा देण्यावर विचार करू ! – जो बायडेन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना दूरभाष !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन व इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना दूरभाष करून गाझामधील हमासच्या विरोधात चालू असलेले युद्ध तात्काळ थांबवण्यास सांगितले आहे. तसेच बायडेन यांनी नेतन्याहू यांना दूरभाषवर सांगितले, ‘पॅलेस्टिनी नागरिक आणि साहाय्यताकार्य करणारे परदेशी कर्मचारी यांना संरक्षण दिले पाहिजे अन्यथा अमेरिका हमासविरुद्धच्या युद्धात इस्रायलला पाठिंबा देण्याच्या निर्णयावर पुन्हा विचार करील.’

दुसरीकडे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, इस्रायल युद्ध हरतांना दिसत असून त्याने हे युद्ध थांबवले पाहिजे. संघर्ष संपवण्यासाठी त्वरीत तोडगा काढण्यात यावे, असे आवाहनही त्यांनी केले. सध्या गाझामध्ये इस्रायलच्या जोरदार आक्रमणे चालू आहेत. यावरून अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. आतापर्यंत याते ३३ सहस्रांहून अधिक लोक मारले गेले आहेत.