निवडणुकीच्या कालावधीत निकालाचे अनुमान घोषित करण्यावर प्रतिबंध !
मुंबई – निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या कालावधीत निवडणूक अनुमान (ओपिनियन पोल किंवा एक्झिट पोल) घोषित करण्यावर प्रतिबंध घातला आहे. १९ एप्रिल या दिवशी सकाळी ७ वाजल्यापासून १ जून या दिवशी सायंकाळी ६.३० पर्यंत निवडणूक अनुमान घोषित करण्याला प्रतिबंध आहे. मतदान संपण्याच्या आधी ४८ घंट्यांत निवडणूक अनुमान किंवा मतदान सर्वेक्षणाच्या परिणामांचे प्रकाशन अथवा प्रसारण करण्यावर प्रतिबंध असणार आहे, हे आयोगाने स्पष्ट केले आहे.
सार्वजनिक स्वच्छतेचे नियम मोडणार्यांना ऑनलाईन दंड !
मुंबई – सार्वजनिक स्वच्छतेचे नियम मोडणार्यांना आता दंडाची पावती ऑनलाईन पद्धतीने पाठवली जाणार आहे. मोबाईल ॲपद्वारे पावती दिली जाईल आणि दंड भरण्याचा ऑनलाईन पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. यामुळे महानगरपालिकेला कोणत्या दिवशी किती रक्कम, तसेच कोणत्या प्रकारासाठी दंड आकारणी झाली, याचा अचूक तपशील कळू शकेल.
सोमालिया चाचे अल्पवयीन आहेत का, याची चौकशी करा !
मुंबई – सोमालियाच्या किनारपट्टीवरील कारवाईत अटक करण्यात आलेले ३५ पैकी ७ सोमाली चाचे अल्पवयीन असल्याच्या दाव्याची चौकशी करा, असे आदेश विशेष न्यायालयाने बाल न्याय मंडळाला दिले. या सातही चाच्यांना सध्या डोंगरी येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे.
विशेष न्यायालयाचे आदेश
यंदाही अंधेरी ‘सब वे’मध्ये पाणी साचणार !
मुंबई – पावसाळ्यात अंधेरी ‘सब वे’मध्ये पाणी साचू नये; म्हणून पालिकेने मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचा निर्णय घेतला होता; पण त्याला अजून वेळ लागणार असल्याने यंदा तेथे पावसाचे पाणी साचल्यास वाहतूक थांबवणे हाच पर्याय असणार आहे.
संपादकीय भूमिका : समुद्रात भर टाकून शहर उभारल्यावर दुसरे काय होणार ?
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा अटकेत !
नाशिक – अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा अपलाभ घेत तिच्यावर बलात्कार करणार्या २० वर्षीय तरुणाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रोशन बुटे असे आरोपीचे नाव आहे. गर्भवती मुलीने नवजात बाळाला जन्म दिला आहे.
संपादकीय भूमिका : अशा वासनांधांना कठोर शिक्षाच द्यायला हवी !
घोडबंदर रोड (ठाणे) येथून अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता !
ठाणे – ओवळा, घोडबंदर रोड येथून १३ वर्षांची अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे. मध्यरात्री २ वाजता ही मुलगी लघुशंकेसाठी गेली होती. ती परत घरात आली. त्यानंतर पालक झोपले; मात्र सकाळी ६ वाजता मुलगी बेपत्ता असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पालक सुरेंद्र यादव यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे.
असुरक्षित ठाणे !