६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुप्रिया माथूर यांच्याकडून सौ. राधिका कोकाटे यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

‘सौ. सुप्रिया माथूर या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील स्वयंपाकघरातील सेवांचे नियोजन करतात. त्यांच्याकडून मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यातून त्यांचे प्रकट होणारे गुण येथे दिले आहेत.

सौ. सुप्रिया माथूर

१. सेवांचे नियोजन करणे

अ. सौ. सुप्रियाताई ‘कुणी कुठली सेवा करायची ?’, ते समजावून सांगते आणि सेवेचा पाठपुरावाही घेते. ती आम्हाला काही समजले नसेल, तर विचारून घ्यायला सांगते.

आ. ती आम्हाला सेवेचा प्राधान्यक्रम सांगून ‘सेवा करण्यासाठी किती वेळ लागेल ?’, याची समयमर्यादा घालायला सांगते. त्यामुळे नवीन येणार्‍या साधकाला सेवा करणे सोईचे होते.

इ. ताई एखाद्या दिवशी आश्रमात आली नाही, तरी ती स्वयंपाकघरातील सर्व सेवांचे नियोजन करते.

२. सेवेचा अभ्यास करणे

सौ. राधिका कोकाटे

अ. ताई आम्हाला ‘एखादी सेवा करायला आपण कुठे अल्प पडलो ? एवढा वेळ का लागला ?’, याचा अभ्यास करायला सांगते.

आ. सुप्रियाताई सर्वांचे बारकाईने निरीक्षण करते आणि कुणी चुकत असेल, तर त्याला लगेच प्रयत्न करायला सांगते. पर्याय सांगते आणि दृष्टीकोनही देते.

३. साधक नसेल, तर स्वतः सेवा पूर्ण करणे

अ. स्वयंपाकघरात कधी अनेक तातडीच्या सेवा असतात आणि साधकसंख्या अल्प असते. अशा वेळी ती सेवेचा ताण घेत नाही. सर्व देवावर सोपवून ती इतरांचे साहाय्य घेते आणि सेवा पूर्ण करते.

आ. एखादा साधक आला नसेल, तर ताई त्याची वाट न पहाता ती सेवा स्वतः पूर्ण करते.

४. इतरांचा विचार करणे

अ. ‘साधकांची धावपळ होऊ नये, सर्व सेवा वेळेत पूर्ण केल्या की, साधकांना वेळेवर विश्रांतीला जाता येईल’, यासाठी तिची धडपड चालू असते.

आ. ताईला एखादे सूत्र सांगायचे असेल, तर ती ‘त्या साधकाला काय वाटेल ?’, असा विचार करत नाही, तर ‘त्यातून त्याची प्रगती कशी होईल’, याकडे तिचे लक्ष असते.’

– सौ. राधिका कोकाटे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.११.२०२३)