वॉशिंग्टन – ‘ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी इन अमेरिका’ या संघटनेने (ओ.एफ्.बीजेपी – यू.एस्.ए.ने) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ अमेरिकेतील २० वेगवेगळ्या शहरांमध्ये वाहनफेर्या काढल्या. आगामी निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (‘रालोआ’ला) ४०० हून अधिक जागा मिळवून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी भारतातील जनतेला केले.
#WATCH प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के समर्थन में बीजेपी के प्रवासी समर्थकों ने 31 मार्च को अटलांटा में एक कार रैली का आयोजन किया।
रैली में लगभग 150 कारों ने भाग लिया, सभी कारें भाजपा और भारतीय झंडों से सजी हुई थीं और उन्होंने 'अबकी बार 400 पार', 'मैं हूं मोदी परिवार' लिखी तख्तियां… pic.twitter.com/xNgMIR7ahZ
— ANI_HindiNews (@AHindinews) April 1, 2024
१. ‘ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी इन अमेरिका’चे अध्यक्ष अडापा प्रसाद म्हणाले, ‘नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप आणि ‘रालोआ’ ४०० हून अधिक जागा जिंकत असल्याचा अनुमान आहे. यामुळे अमेरिकेतील भारतीय समुदाय पुष्कळ उत्साहित आहे.
२. ‘ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी इन अमेरिका’चे सरचिटणीस वासुदेव पटेल म्हणाले की, अमेरिकेच्या राजधानीतही लोकांनी पंतप्रधान मोदी यांच्या समर्थनार्थ वाहनफेरी काढली. ते म्हणाले की, भाजपचा विजय केवळ भारतासाठीच नाही, तर जगात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठीही महत्त्वाचा आहे.