Pondicherry University : पुद्दुचेरी विद्यापिठातील नाटकातून सीता आणि हनुमान यांचा अवमान

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून पोलिसांकडे कारवाई करण्याची मागणी

पुद्दुचेरी – येथील पुद्दुचेरी विद्यापिठाच्या वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमात ‘एझिनी’मध्ये ‘सोमायनम’ हे नाटक सादर करण्यात आले होते. या नाटकात रामायणातील पात्रांचे विकृत आणि अपमानजक पद्धतीने चित्रण करण्यात आले. विद्यापिठातील भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून ‘सोमायनम्’ नाटकाचे दिग्दर्शक आणि अन्य कलाकार यांच्या विरोधात तातडीने पोलीस कारवाई करण्याची मागणी केली आहे. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली विद्यापिठातील काही जणांकडून धार्मिक भावना आणि सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील असणार्‍या गोष्टींचे विडंबन केले जाते, असे ‘अभविप’च्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

नाटकातील अवमानजनक प्रसंग

१. सीतेच्या अपहरणाच्या प्रसंगापूर्वी सीता रावणाला गोमांस खाण्याविषयी विचारते, असे दाखवण्यात आले आहे.

२.  सीतेची अग्नीपरीक्षा ही अपमानकारक असल्याचा संदेश नाटकाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

३.  या नाटकात सीतेची कथा मांडण्यासाठी ‘गीता’ या व्यक्तिरेखेचा वापर करण्यात आला होता. गीता नावाचे हे पात्र रावणासमवेत नाचतांना दाखवण्यात आले आहे.

५. सीता रावणाला म्हणते की, मी विवाहित आहे; पण आपण मित्र होऊ शकतो.

संपादकीय भूमिका

अशा प्रकारचे हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍यांवर देशात कठोर शिक्षा होत नसल्याने अशा घटना घडतच आहेत. ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !