भूलथापांना भुललेले आस्तिक !

वेदमूर्ती श्री. भूषण दिगंबर जोशी

‘रामायण घरात ठेवले, तर पत्नीचा वियोग होतो. महाभारत घरात ठेवले, तर घरात भांडणतंटे होतात. ब्रिटीश पुरस्कृत विचारजंतांनी मांडलेले हे कुविचार अनेक पापभिरु आस्तिकांनी  आंधळेपणाने पुढे चालवले. आजही अनेक आस्तिक बिनधास्तपणे हेच सांगतात. त्यामुळे अनेक पिढ्या रामायण आणि महाभारत यांचे अध्ययन अन् शिकवण यांपासून दूर गेल्या. परिणामी रामायण, महाभारत यांच्या नावावर खपवलेल्या चुकीच्या गोष्टी आपणास सत्य वाटू लागल्या. रामायण आणि महाभारत हा इतिहास आहे. आचरण काय करावे ? कसे वागावे ? कसे वागू नये ? धर्म म्हणजे काय ? नीती म्हणजे काय ? याचा आदर्श वस्तूपाठ या दोन्ही ग्रंथांमध्ये दिला आहे. धर्मग्रंथांचा हा पाया पद्धतशीरपणे बाजूला केला गेला आणि आपण अलगद या जाळ्यात अडकलो.’

– वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी, वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग.