सनातनच्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी (वय ८४ वर्षे) यांचा चेहरा कधी कधी गंभीर दिसण्यामागील कार्यकारणभाव !

पू. कुसुम जलतारेआजी

अधिवक्ता योगेश जलतारे :‘पू. आजींचा (सनातनच्या ९५ व्या (व्यष्टी) संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी यांचा) चेहरा कधी कधी पुष्कळ गंभीर असतो; परंतु मध्येच कुणी साधक बोलायला आल्यास त्या असा सुंदर प्रतिसाद देऊन गोड हसतात की, ‘काही वेळापूर्वी गंभीर असलेल्या पू. आजी ह्याच का ?’, असा मला प्रश्न पडतो. त्या गंभीर असतांना त्यांचे डोळे शून्यात असतात आणि त्या निर्विचार स्थितीत असतात. एरव्ही पू. आजी सतत भावावस्थेत असतात. त्यांना साधकांविषयी पुष्कळ प्रेम वाटत असते. कुणाचे चांगले झाले की, पू. आजींनाच अधिक आनंद होतो. त्यांना कशाचीच काळजी वाटत नाही. त्या आता कुटुंबियांपासूनही अलिप्त झाल्या आहेत.

अधिवक्ता योगेश जलतारे

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ : पू. जलतारेआजी साधकांसाठी प्रार्थना, नामजपादी आध्यात्मिक उपाय करत असल्याने त्यांच्यातील मारक भाव प्रकट असतांना त्यांचा चेहरा गंभीर असतो; परंतु साधक बोलायला आल्यावर त्यांच्यातील प्रीतीमुळे त्यांचा चेहरा हसरा असतो.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ‘त्यांचा चेहरा गंभीर का असतो’, ते कळले ना ? तो साधकांसाठी नव्हे, तर त्यांचा समष्टी आध्यात्मिक त्रास दूर होण्यासाठी गंभीर होतो.’ (पू. आजींना उद्देशून) तुम्ही इतकी पटपट आध्यात्मिक प्रगती कशी करत आहात ? माझी काळजी मिटली. तुमची प्रगती चांगली होत आहे.

पू. (श्रीमती) जलतारेआजी : सर्व देवच करतो. त्याच्यामुळेच सर्वकाही होत आहे. मी काही करू शकत नाही.’

– अधिवक्ता योगेश जलतारे (पू. (श्रीमती) जलतारेआजी यांचा मुलगा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.१.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक