२७ ते २९.१०.२०२३ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधकांसाठी शिबिर झाले. रामनाथी आश्रम, म्हणजेच भूवैकुंठ पहाण्याची मला पुष्कळ आतुरता होती. गुरुकृपेने मला ते पहाण्याची संधी मिळाली. त्या शिबिरात सहभागी झाल्यावर मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. आश्रमात ईश्वर, देवता, पृथ्वीतत्त्व, जलतत्त्व आणि वायुतत्त्व यांचे अस्तित्व जाणवणे : मला आश्रमात ठिकठिकाणी चंदनाचा सुगंध आला. ‘आश्रमात सगळीकडे ईश्वरी अस्तित्व आहे. ठिकठिकाणी देवता उभ्या आहेत. आश्रमात जलतत्त्व आणि वायुतत्त्व पुष्कळ आहे’, असे मला जाणवले. आश्रमात चालतांना ‘मी पाण्यावरून चालत आहे’, असे मला वाटत होते. ‘मला वार्याचा स्पर्श झाल्यावर त्यातून मला आध्यात्मिक स्तरावर लाभ होत आहेत’, असे जाणवले.
२. मला साधकांकडून प्रेमभाव शिकायला मिळाला. माझी अंतर्मुखता वाढली.
३. व्यासपिठावर बसलेल्या वक्त्याच्या भोवती मला निळ्या प्रकाशाची प्रभावळ दिसत होती.
४. श्री भवानीमातेच्या मूर्तीचे दर्शन घेतांना मला कुंकवाचा सुगंध आला.
५. मी डोळे मिटून देवीला प्रार्थना करत असतांना मला डोळ्यांसमोर लाल तांबूस रंग दिसला. नंतर मी डोळे उघडल्यावर मला मूर्तीतून लाल रंग प्रक्षेपित होतांना दिसला.’
– सौ. छाया पवार, शिरवळ, सातारा. (४.१२.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |