रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

गोवा येथील सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. श्री. जनार्दन प्रसाद शुक्ल (प्रांतीय महामंत्री, समग्र शिक्षक संघ मध्यप्रदेश), भट्टी, इटारसी, मध्यप्रदेश.

अ. ‘आश्रम पाहून पुष्कळ चांगले वाटले. माझ्या मनाला आध्यात्मिक शांती प्राप्त झाली. आश्रमात येऊन वाटले, ‘जणू काही आम्ही स्वर्गातच आलो आहोत.’

आ. ‘सूक्ष्मजगता’संबंधीचे प्रदर्शन पाहून पुष्कळ चांगली माहिती मिळाली.’

२. श्री. अनिल राठौर, गोपाल वाटीका, सिहोर, मध्यप्रदेश.

अ. ‘आश्रम पाहून फारच चांगले वाटले. असा प्रसार आणि अशी हिंदु जागृती व्हावी की, ती संपूर्ण देशभर पसरली पाहिजे.’

३. श्री. कौतुभ गुप्ता (हनी) (विश्वस्त, मां बम्लेश्वरी मंदिर ट्रस्ट समिती), डोंगरगड, छत्तीसगड.

अ. ‘रामनाथी आश्रम पाहून मला अद्वितीय, अद्भुत आणि अलौकिक अशा गोष्टींची माहिती मिळाली.

आ. ‘सनातन संस्कृती आणि सकारात्मक ऊर्जा यांचा प्रत्यक्ष जीवनावर प्रभाव कसा होतो ?’, हे मला समजले.

इ. भविष्यात कुटुंबियांना समवेत घेऊन आश्रमात येण्याचा मी प्रयत्न करीन.’

४. श्री. जितेंद्र राठोड, श्री परशुराम तपोवन आश्रम, विरार.

अ. ‘आश्रमात सर्वकाही प्रशंसनीय आहे.’

५. श्री. दुर्गेश देवांगन (बजरंग दल), कवर्धा, छत्तीसगड.

अ. ‘आश्रमात आल्यामुळे मला पुष्कळशा गोष्टी शिकता आल्या आणि आपल्या संस्कृतीविषयी जवळून जाणून घेता आले.’

६. श्री. अभिनव क. पांडे (अभिनव भारत), गोरखपूर, उत्तरप्रदेश.

अ. ‘आश्रम अत्यंत शांत आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण आहे.’

७. श्री. अंकित द्विवेदी (गोरक्षक), रायपूर, छत्तीसगड.

अ. ‘रामनाथी आश्रमात पुष्कळ सकारात्मकता आणि दिव्य शक्ती आहे.’

८. श्री. घनश्याम व्यास (राज्यप्रमुख, लष्कर-ए-हिन्द), निजामाबाद, तेलंगाणा.

अ. ‘रामनाथी आश्रमातील सकारात्मक ऊर्जा मन शांत करते.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : ९.१०.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म- जगत्’ असे संबोधतात.