सकल हिंदु समाजाच्या बैठकीतील निर्णय !
रत्नागिरी – येत्या ४ मार्च या दिवशी सकल हिंदु समाजाच्या वतीने हिंदु जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. ‘ड्रगमुक्त रत्नागिरी’, ‘भूमी अतिक्रमण’, ‘लव्ह जिहादमुक्त रत्नागिरी’ ‘चलो रत्नागिरी’ ‘चलो रत्नागिरी’ अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या.
हा मोर्चा सकाळी १०.३० वाजता शिवतीर्थ, मारुति मंदिर येथून चालू होणार आहे. जयस्तंभ येथे या मोर्चाला प्रमुख वक्त्या प्रखर हिंदुत्वनिष्ठ काजल हिंदुस्थानी मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर जिल्हाधिकार्यांना सकल हिंदु समाजाच्या शिष्टमंडळाकडून निवेदन देऊन समारोप होईल. २८ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या सकल हिंदु समाजाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीला सकल हिंदु समाजाचे ८० प्रतिनिधी उपस्थित होते. या मोर्चाला अधिकाधिक हिंदू उपस्थित रहातील, याचे नियोजन करण्यात येत आहे. बैठका, हँडबिले, भित्तीपत्रके, बॅनर, रिक्शा अनाऊन्समेंट, तसेच प्रसारमाध्यमाच्या साहाय्याने या मोर्चाचा प्रसार करण्याचे ठरवण्यात आले. ‘प्रशासनाला जाब विचारण्यासाठी हिंदूंच्या संघटित शक्तीचे प्रदर्शन रत्नागिरीत करावेच लागेल’, असा एकमुखी निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
या मोर्चात सर्व हिंदु बांधवानी, माता-भगिनींनी आपले राष्ट्र आणि धर्म कर्तव्य समजून बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सकल हिंदु समाजाने केले आहे.
हिंदुत्वनिष्ठ विचारणार जाब !१. रत्नागिरीत शासकीय ग्रंथालयाच्या जागेत असणारे अनधिकृत बांधकाम जिल्हाधिकार्यांनी पाडण्याचे आदेश दिले असतांनाही प्रशासन मात्र टाळाटाळ का करते? २. राजापूर पन्हळे येथे अनधिकृत बांधकाम चालू आहे. ३. शिरगाव, आडी येथेही भूमी अतिक्रमण चालू आहे. ४. रत्नदुर्गावर रेखांकन करून सरकारी भूमीवर अतिक्रमण केले आहे. ५. हिंदूंच्या भूमी बळकावणारे विभागीय वक्फ बोर्डास रत्नागिरीत मान्यता का दिली जाते ? याचा जाब विचारण्यासाठी या मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. |