अद्वैतवादाविषयी करण्यात आलेला खोटा प्रचार

प.पू. स्वामी वरदानंद भारती

भारतीय तत्त्वज्ञानाने कुणाचीही महत्त्वाकांक्षा मारली नाही किंवा सर्वांनी परलोकवादी असावे, असे प्रतिपादले नाही. मोक्षाची महती आवश्य गायली; पण त्यासवेच धर्माच्या जोडीने पुरुषार्थ म्हणून काम आणि अर्थास प्रतिष्ठाही दिली आहे. हे लक्षात न घेता ‘भारतीय तत्त्वाज्ञानाने विशेषतः अद्वैतवादाने त्यातही मायावादाने जीवनाकांक्षा मारली आहे. तिला निराशावादी होण्यास भाग पाडले आहे’, अशा स्वरूपाचा खोटा प्रचार तथाकथित बुद्धीवादी करत असतात.

– प.पू. स्वामी वरदानंद भारती

(साभार : ग्रंथ ‘जीवनसाधना’)