साधकांची आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी त्यांना मार्गदर्शन करणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या चरणी प्रार्थना करतांना कु. मयुरी डगवार यांना सुचलेली कविता येथे देत आहोत.
साधका रक्षण्या पार्वती (टीप १) भूवरी अवतरली ।
तपश्चर्येने तिच्या वसुंधरा पावन झाली ।। १ ।।
वात्सल्य प्रीती तिच्या हृदयी ।
साधक जनांची ती जननी ।। २ ।।
स्मरणाने तिच्या नष्ट होऊनी पापराशी ।
आनंदाची अनुभूती घेता येई ।। ३ ।।
साधकांच्या आत्मोन्नतीसाठी ।
निशीदिनी ती कष्ट घेई ।। ४ ।।
त्यातून साधक जन्म-मृत्यूचा फेरा चुकवती ।
त्यातून होत असे साधक अन् संत निर्मिती ।। ५ ।।
क्षणभराच्या दर्शनाने दूर होती सर्व त्रास ।
नवचैतन्य आनंद शांती लाभतसे साधक जिवांस ।। ६ ।।
शरणागत आम्ही सर्व जण तव चरणी ।
अशीच राहो तुझी कृपादृष्टी आम्हावरी ।। ७ ।।
प्रार्थितो आम्ही तव गौरवदिनी ।
होऊ दे सेवा आमच्याकडून तुला अपेक्षित अशी ।। ८ ।।
हेच मागणे देवी तव चरणी ।
कृतज्ञतेने लीन राहो आम्ही सदैव तव चरणी ।। ९ ।।
टीप १ – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
– कु. मयुरी डगवार, रामनाथी आश्रम, गोवा (१.९.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |