धर्मशास्त्रांचा व्यापक प्रचार-प्रसार होण्यासाठी मंदिरांमध्ये धर्मग्रंथांची वाचनालये हवीत ! – नारायण देशपांडे

‘संस्कृती संवर्धन’ आणि ‘विकास महासंघाचा’ १४ वा वर्धापनदिन

पिंपरी (जिल्हा पुणे) – हिंदु संस्कृतीतील उच्च तत्त्वे सामान्य माणसांपर्यंत पोचवण्यासाठी रचनात्मक प्रयत्न करणे हेच मंदिरांचे सर्वश्रेष्ठ योगदान आहे. मंदिरांच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती, भारतीय संस्कृती, तसेच आपल्या धर्मशास्त्रांचा व्यापक प्रचार आणि प्रसार होण्यासाठी सामुदायिक प्रयत्न झाले पाहिजेत. मुख्य मंदिरांमध्ये धर्मग्रंथांची वाचनालये असायला पाहिजेत, असे प्रतिपादन नारायण देशपांडे यांनी केले. ते ‘संस्कृती संवर्धन’ आणि ‘विकास महासंघाच्या’ १४ व्या वर्धापनदिनी मार्गदर्शन करतांना बोलत होते. या वेळी अनेक देवस्थानांचे विश्वस्त, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे कार्यकारिणी सदस्य, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.