बनभूलपुरा येथे पैसे वाटणारा आणि चिथावणी देणारे व्हिडिओ प्रसारित करणारा भाग्यनगरचा सलमान खान कह्यात !

उत्तराखंडच्या हल्द्वानी हिंसाचाराचे प्रकरण

प्रतिकात्मक छायाचित्र

हल्द्वानी (उत्तराखंड) – येथील बनभूलपुरा येथे २ आठवड्यांपूर्वी प्रशासनाने अनधिकृत मदरसा पाडल्यावरून स्थानिक धर्मांध मुसलमनांनी पोलिसांवर आक्रमण केले होते. त्यानंतर तेलंगाणातून थेट उत्तराखंड गाठून हिंसाचारग्रस्त भागांत येऊन पैसे वाटणार्‍या, तसेच इन्स्टाग्रामवर चिथावणी देणारे व्हिडिओ प्रसारित करणार्‍या भाग्यनगर (तेलंगाणा) येथील सलमान खान याला पोलिसांनी चौकशीसाठी कह्यात घेतले आहे. त्याने हल्द्वानी येथे किती पैसे नेले होते, याचा तपास केला जात आहे. पोलीस आयुक्त प्रल्हाद नारायण मीणा यांनी सांगितले की, वितरित करण्यात आलेल्या रोख रकमेचा स्रोत आणि सलमानच्या इन्स्टाग्राम खात्यावरून पोस्ट केलेले व्हिडिओ तपासले जात आहेत.

सलमान खान याचे ‘हैदराबाद यूथ करेज’ या नावाचे इन्स्टाग्रामवर खाते आहे. तो याच नावाने तेथे एक संस्थाही चालवतो. बनभूलपुरा येथे झालेल्या हिंसाचारानंतर तो येथील मुसलमानांसाठी निधी गोळा करत होता. त्याने प्रसारित केलेल्या व्हिडिओजमध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईत मारल्या गेलेल्यांना ‘शहीद’ म्हटले आहे. अन्य एका व्हिडिओत तो बनभूलपुरा भागातील लोकांना पैशांनी भरलेली बॅग घेऊन पैसे वाटतांना दिसत आहे.

संपादकीय भूमिका

  • धर्मांध मुसलमानांची संपर्कयंत्रणा कशा प्रकारे देशभर पद्धतशीरपणे कार्यरत आहे, त्याचे हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. यांवर आळा घालण्यासाठी सरकारी यंत्रणांनी त्यांची पाळेमुळे खणून काढणे आवश्यक !