मुरेना (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील मुरेना जिल्ह्यात एका महिला तिच्या पतीवर बलात्काराचा आरोप करणार्या महिलेच्या घरी तोडगा काढण्यासाठी गेली होती. तेथे ३ पुरुषांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी त्या महिलेवर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळले. महिला ८० टक्क्यांहून अधिक भाजली असून तिला उपचारासाठी ग्वाल्हेर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
१. मुरेना जिल्ह्यातील अंबा पोलीस ठाण्याचे प्रमुख आलोक परिहार यांनी सांगितले की, पीडित महिलेच्या पतीवर बलात्काराचा आरोप झाला होता. या प्रकरणी त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली होती आणि नुकतीच त्याची जामिनावर सुटका झाली होती.
२. पतीवर आरोप करणार्या महिलेशी चर्चा करण्यासाठी आरोपीची पत्नी तिच्या घरी गेली होती. तेथे तिघांनी तिच्यावर बलात्कार केल्यावर तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी घरातील इतर सदस्यांनी तिच्यावर पेट्रोल ओतून तिला जाळले.
३. या प्रकरणी पोलीस अधीक्षक अरविंद ठाकूर यांनी सांगितले की, दोन्ही कुटुंबात वाद चालू होता. पोलिसांनी रुग्णालयात जाऊन पीडित महिलेचा जबाब नोंदवला आहे.

नर्हे (पुणे) येथे प्रतिबंधित गुटखा कह्यात : दोन धर्मांध कह्यात
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati