नवी देहली – उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे अनधिकृत मदरसा पाडण्यासाठी गेलेल्या पथकावर शेकडो धर्मांधांनी आक्रमण केले. त्यांनी पोलीस ठाण्याला घेराव घालून ठाणे जाळण्याचा प्रयत्न केला. या हिंसाचारात ५ जण ठार झाले, तर १०० हून अधिक पोलीस घायाळ झाले. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ४२ हून अधिक लोकांना अटक केली आहे. या हिंसाचाराच्या चौकशीतून यामागे पाकिस्तान ‘टूलकिट’ असल्याचे समोर आले आहे. सामाजिक माध्यमांद्वारे चिथावणी देण्यात आल्याने ही घटना घडल्याचे समोर आले आहे. चौकशीत सर्व सामाजिक माध्यमांतील खाती पाकिस्तानमधून संचालित केली जात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी चौकशीचा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाकडे सोपवला आहे.
१. न्यायालयाने जेव्हा हल्द्वानीतील बनभूलपुरामधील अतिक्रमणांवर कारवाई करण्याचा आदेश दिला, त्यानंतर पाकिस्तानने तेथे दंगल घडवण्याचा कट रचत पाकिस्तानी टूलकिट सिद्ध केले. यासाठी महंमद अख्तर, आसिफ पॉलिटिक लेस, महंमद आलम, अरकाम, आलम शेख आणि आसिफ मन्सूरी यांच्या नावाने ‘एक्स’ वर १० खाती उघडण्यात आली. त्यांद्वारे मुसलमानांना चिथावणी देण्यात आली.
टूलकिट म्हणजे काय ?एखाद्या प्रकरणात मोठ्या स्वरूपाचे आंदोलन करतांना त्याचा एक कृती कार्यक्रम सिद्ध केला जातो. आंदोलन आणखी पुढच्या टप्प्यावर नेणे वा तीव्र करणे या उद्देशाने हा कार्यक्रम सिद्ध केला जातो त्याला ‘टूलकिट’ असे म्हटले जाते. |
२. पोलिसांना चौकशीमध्ये हल्द्वानीमध्ये हिंसाचार चालू झाल्यावर पाकिस्तानमधील कराची, इस्लामाबाद, ऐबोटाबाद आणि लाहोर येथून ९ ‘हॅशटॅग’ (एकाच विषयावर चर्चा घडवून आणणे) सक्रीय झाल्याचे पुरावे मिळाले आहेत. त्यात ‘हल्द्वानी बर्निंग’, ‘हल्द्वानी राइट्स’, ‘हल्द्वानी व्हॉयलन्स’ या शब्दांचा वापर करून चिथावणीखोर पोस्ट प्रसारित करण्यात आल्या.
संपादकीय भूमिकापाक भारतात सहज हिंसाचार घडवून आणू शकतो, हे भारतील गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणा यांना लज्जास्पद ! |