Haldwani Violence : हल्द्वानी (उत्तराखंड) येथे बेकायदेशीर मशिदीच्या जागेवर उभारण्यात आली पोलीस चौकी !

  • मुख्यमंत्री धामी यांनी चौकी उभारण्याचे जाहीर केल्यावर २४ घंट्यांत कार्यवाही !

  • धर्मांधांनी आक्रमण केलेल्या २ महिला पोलिसांकडूनच करण्यात आले उद्घाटन !

डेहराडून (उत्तराखंड) – ८ फेब्रुवारी या दिवशी राज्यातील हल्द्वानी येथील बनभूलपुरा भागात धर्मांध मुसलमानांनी दंगल घडवली होती. स्थानिक प्रशासनाने बुलडोझरद्वारे तेथील बेकायदेशीर मशीद आणि मदरसा पाडल्यामुळे संतप्त धर्मांधांनी पोलिसांवर आक्रमण केले होते. त्या वेळी त्यांनी पोलिसांची शस्त्रास्त्रेही पळवून नेली होती. या आक्रमणात ५ दंगलखोरांसह ६ जण मारले गेले होते, तर ३०० हून अधिक जण घायाळ झाले होते.

यानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी ‘जेथे बेकायदेशीर मशीद होती, तेथेच पोलीस चौकी बांधण्यात येईल’, अशी घोषणा केली. त्यानुसार २४ घंट्यांच्या आतच तेथे पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. हिंसाचारात घायाळ झालेल्या दोन महिला पोलिसांकडून या चौकीचे उद्घाटनही करण्यात आले आहे. या ठिकाणी आता २४ तास पोलीस बंदोबस्त रहाणार आहे. नैनितालचे वरिष्ठ पोलीस आयुक्त प्रल्हाद नारायण मीणा यांनी याविषयीची माहिती दिली. या पोलीस चौकीचे दायित्व मुख्य हवालदाराकडे सोपवण्यात आले असून त्याच्यासमवेत ४ हवालदार आणि शिपाई कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

संपादकीय भूमिका

जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी कसे प्रयत्न केले पाहिजेत ?, यावर उत्तरप्रदेश आणि आसाम यांच्यानंतर आता उत्तराखंडचे नाव समोर येत आहे. अशा प्रकारची कारवाई देशभरात होऊ लागली, तर काही काळातच ‘जिहादी आतंकवादा’ची नांगी ठेचली जाईल, यात शंका नाही !