मनसेने पोलिसांना समवेत घेऊन केली कारवाई !

ठाण्यातील म्हाडा वसाहतीत बेकायदेशीर मदरसा

अविनाश जाधव

ठाणे – मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी पोलिसांसमवेत येथील एम्.एम्.आर्.डी.ए.च्या इमारतीत जाऊन इमारतीतून ध्वनीयंत्रणेद्वारे अजान देणार्‍यांना चांगलेच फटकारले. एम्.एम्.आर्.डी.ए.च्या इमारतीत काही धर्मांधांनी तेथे बेकायदेशीर मदरसा चालू केला आहे. तिथे प्रत्यक्षात नमाज आणि अजान चालू असतांना जाधव पोलिसांसमवेत त्यांच्या घरी गेले. पोलिसांनी त्यांची ध्वनीयंत्रणा आणि नमाजाच्या वेळा लिहिलेला फळा कह्यात घेतला.

१. जाधव येथील मुसलमान कुटुंबाला म्हणाले, ‘‘शाळा-महाविद्यालय यांच्या  विद्यार्थ्यांनी तक्रार केली आहे. जोरजोरात प्रार्थना लावून ठेवता. घरी प्रार्थना करा. आमचे काही म्हणणे नाही. आम्ही तुमच्या समवेत आहोत; मात्र ओरडून करत असाल, तर ते योग्य नाही.’’

२. येथे दिवसातून ३-४ वेळा नमाज पढला जात होता. बाहेरूनही काही जण नमाज पढायला येत होते. मुंब्यातून काही जणांना येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. ते लोक हे करत आहेत. मशिदीवर ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात अजान दिली जाते, त्याप्रमाणे इमारतीत ध्वनीयंत्रणा लावून त्याद्वारे ही अजान दिली जाते. या इमारतीत घरी मदरसा चालू करण्यात आला आहे.

‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मशिदीवर भोंगे लावता येत नाहीत, तर यांनी आता घरावर लावणे चालू केले आहे. वाईट विचारांचे लोक इथे येतात आणि इथे काही तरी चालू आहे, असा आम्हाला संशय येत आहे’, असे या वेळी अविनाश जाधव यांनी माध्यमांना सांगितले.

संपादकीय भूमिका

  • निवासासाठी असलेल्या वसाहतीमध्ये बेकायदेशीर मदरसा चालू होईपर्यंत प्रशासन आणि पोलीस झोपा काढत होते का ? मनसेने या प्रकरणात लक्ष वेधले नसते, तर हा बेकायदेशीर मदरसा असाच चालू राहिला असता !