Hindu Rashtra : भारत ‘हिंदु राष्ट्र’ होणे आता निश्‍चित ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

प.पू. गोविंददेव गिरि महाराज यांचा अमृत महोत्सव

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

आळंदी (जिल्हा पुणे), ८ फेब्रुवारी (वार्ता.) : आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांचे दर्शन करण्याचे भाग्य प.पू. गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त मला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. यात राजमाता जिजाऊ यांचा मोठा वाटा होता. प.पू. गोविंददेव गिरि महाराजांच्या मार्गदर्शनाखाली रामलला अयोध्येत विराजमान झाले आहेत. त्यामुळे भारत त्रेतायुगात जगत आहे. आता भारत हिंदु राष्ट्र होईल हे निश्‍चित ! संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पुण्यभूमीत कथा करण्याचा संकल्प मी आज करत आहे, असे प्रतिपादन बागेश्वर धाम पीठाचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी केले. प.पू. गोविंददेव गिरि महाराज  यांच्या अमृत महोत्सवानिमित्त श्री क्षेत्र आळंदी येथे ४ ते ११ फेब्रुवारी या काळात ‘गीताभक्ती महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या पाचव्या दिवशी म्हणजे ८ फेब्रुवारीला पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे भागवत कथेच्या वेळी आगमन झाले. त्या वेळी ते बोलत होते.

सनातन संस्थेच्या वतीने प.पू. गोविंददेव गिरि महाराज यांचा सन्मान !

प.पू. गोविंददेव गिरी महाराज (डावीकडून तिसरे) यांना श्रीरामाची प्रतिमा भेट देतांना सनातनचे प्रा. विठ्ठल जाधव (उजवीकडील)

या महोत्सवाच्या पाचव्या दिवशी म्हणजे गुरुवार, ८ फेब्रुवारी या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने प.पू. गोविंददेव गिरी महाराज यांचा सन्मान करण्यात आला. सनातन संस्थेचे साधक प्रा. विठ्ठल जाधव यांच्या हस्ते प.पू. गोविंददेव गिरी महाराज यांचा पुष्पहार अर्पण करून सन्मान करण्यात आला, तसेच त्यांना श्रीरामाची प्रतिमा भेट देण्यात आली.