अमेरिकेतील सॅन फ्रान्सिसको येथे स्वतंत्र खलिस्तानसाठी जनमत !  

जनमताच्या वेळी खलिस्तानी समर्थकांमध्ये हाणामारी

स्वतंत्र खलिस्तानच्या संदर्भातील फलक

वॉशिंग्टन (अमेरिका) – सॅन फ्रान्सिस्को येथे २८ जानेवारी या दिवशी स्वतंत्र खलिस्तानच्या संदर्भात तथाकथित जनमत घेण्यात आले. त्या वेळी खलिस्तान समर्थकांमध्ये हाणामारी झाली. याठिकाणी भारताच्या विरोधात फलक लावण्यात आले होते. खलिस्तान समर्थकांमध्ये झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. या व्हिडिओमध्ये दोन गटांचे समर्थक एकमेकांना लाथा-बुक्के मारत असल्याचे दिसत आहे. एका गटाचे नेतृत्व मेजर सिंह निज्जर, तर दुसर्‍या गटाचे नेतृत्व सरबजीत सिंह उपाख्य ‘साबी’ करतांना दिसत होते.

१. एका वृत्तानुसार मेजर सिंह निज्जर याच्या गटाला खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याने बाजूला केले आहे. या कथित जनमत चाचणीत पन्नू हाही उपस्थित होता.

२. कॅनडात नुकतेच एका खलिस्तानी समर्थकाच्या घरावर गोळीबार झाला होता. या गोळीबाराच्या प्रकरणी कॅनडाचे पोलीस अन्वेषण करत आहेत; मात्र कोणतेही अन्वेषण न करता भारतावर आरोप करण्यात आले आहेत.

संपादकीय भूमिका

  • अमेरिका तिच्या भूमीवर स्वतंत्र खलिस्तानसाठी जनमत घेऊ देते, यावरून तिचा भारतद्वेष दिसून येतो. भारताने अमेरिकेला समजेल अशा भाषेत प्रत्युत्तर देणे आवश्यक !