काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गौहत्ती येथील बॅरिकेड्स तोडल्याचे प्रकरण
गौहत्ती (आसाम) – वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही राहुल गांधी यांना अटक करू. आता त्यांना अटक केल्यास ती राजकीय खेळी केल्याचा आमच्यावर आरोप होईल, असे वक्तव्य आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी केले. २३ जानेवारी या दिवशी ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला गौहत्तीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स लावले होते; परंतु काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ते तोडले होते. त्यावर सरमा यांनी वरील वक्तव्य केले.
सौजन्य आज तक
या वेळी सरमा यांनी पोलीस महासंचालकांना राहुल गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याचा आदेश दिला. त्यानुसार गांधी, तसेच के.सी. वेणुगोपाल, कन्हैया कुमार आणि पक्षाच्या इतर नेत्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.
संपादकीय भूमिकाश्रीरामाकडे पाठ फिरवलेले राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष यांच्याकडे आता जनता कायमची पाठ फिरवणार, हे त्यांनी लक्षात ठेवावे ! |