Allahabad HC On Live-In : भारत पाश्‍चात्त्य देश नाही की, जिथे ‘लिव्ह इन’ सामान्य गोष्ट असेल !

  • आपली संस्कृती आणि परंपरा यांचा अभिमान बाळगा ! – न्यायमूर्ती शमीम अहमद

  • ‘लिव्ह इन’ म्हणजे पुरुष आणि स्त्री यांनी विवाह न करता एकत्र रहाण्याची पश्‍चिमी विकृती !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – एका प्रकरणात सुनावणी करतांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने ‘लिव्ह इन रिलेशनशिप’वर ताशेरे ओढले आहेत. न्यायमूर्ती शमीम अहमद यांनी म्हटले की, भारत असा कोणता पाश्‍चात्त्य देश नाही, की जिथे ‘लिव्ह इन’ सामान्य गोष्ट असेल. भारतातील लोकांनी त्यांची संस्कृती आणि परंपरा यांचा अभिमान बाळगला पाहिजे.

१. अलाहाबाद उच्च न्यायालयात आशीष कुमार नावाच्या एका व्यक्तीने याचिका प्रविष्ट करून सांगितले होते की, त्यांचे एका महिलेसमवेत वर्ष २०११ पासून प्रेम संबंध होते. यासंदर्भातील दोघांची छायाचित्रेही कुमार यांनी न्यायालयासमोर ठेवली. त्याने आरोप केला की, महिलेच्या कुटुंबियांनी तिला कैद करून ठेवले असून दोघांना भेटू दिले जात नाही.

२. यावर न्यायालयाने म्हटले की, गेली १३ वर्षे प्रेमसंबंध आहेत, तर दोघांनी विवाह का केला नाही ? अशा प्रकारे छायाचित्रे दाखवून मुलगी आणि तिचे कुटुंबीय यांची प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रयत्न आहे. अशा प्रकरणांवर न्यायालय सुनावणी करणार नाही. या वेळी न्यायमूर्तींनी याचिका फेटाळून लावत याचिकाकर्त्याला २५ सहस्र रुपयांचा दंड ठोठावला.