‘अध्यात्माचे ज्ञान मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक अशा तीन स्तरांवरील असते. मानसिक आणि बौद्धिक ज्ञान असणारे ग्रंथ विपूल प्रमाणात उपलब्ध असतात. त्यांतील लिखाण समजण्यास सोपे असल्यामुळे त्यांची विक्रीही अधिक प्रमाणात होते. त्या तुलनेत आध्यात्मिक स्तरावरील ज्ञान असणारे ग्रंथ समजण्यास थोडे कठीण असतात. त्यामुळे त्यांची विक्री त्या तुलनेत कमी होते.
दोन्ही प्रकारच्या ग्रंथांच्या फलनिष्पत्तीचा विचार केला, तर आध्यात्मिक स्तरावरील ज्ञान असणार्या ग्रंथांच्या अभ्यासामुळे साधनेत प्रगती होणार्यांची संख्या अधिक असते, उदा. सनातन-निर्मित ग्रंथ आध्यात्मिक स्तरावर असल्यामुळे त्यांचा अभ्यास करून आणि त्यांनुसार साधना करून ऑक्टोबर २०२३ पर्यंत १२७ साधक संत झाले आहेत आणि सहस्रो साधक त्या दिशेने वाटचाल करत आहेत.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (११.१.२०२४)