चिपळूण येथे धर्मांधांकडून ‘इन्स्टाग्राम’वर जुन्या बाबरी ढाच्याचे छायाचित्र ठेवून ‘सर तन से जुदा’ (शिरच्छेद) करण्याची धमकी

  • तक्रार प्रविष्ट (दाखल) करून घेण्यास पोलिसांची टाळाटाळ

  • हिंदूंनी केलेल्या प्रखर दबावामुळे धर्मांधांवर गुन्हा नोंद !

चिपळूण, २३ जानेवारी (वार्ता.) –  तालुक्यातील खेर्डी गावातील विकासवाडीत रहाणारा मुबारक खेरडकर याने त्याच्या ‘इन्स्टाग्राम’वर जुन्या  बाबरी ढाच्याचे छायाचित्र ठेवून त्या खाली ‘सबर वक्त हमारा आयेगा, तब सिर धड से अलग किये जायेंगे ’ अशा प्रकारचे धमकीचे लिखाण ठेवले होते. खेर्डी येथील उपसरपंच श्री. विनोद भुरण आणि मनसेचे तालुकाध्यक्ष श्री. अभिनव भुरण यांनी हे लिखाण सामाजिक माध्यमांवर बघितले. २२ जानेवारी २०२४ या दिवशी देशभर आणि चिपळूण येथेही अयोध्या येथील श्री रामलालच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा आनंद सोहळा साजरा होत असतांना अशा प्रकारे ‘सर तन से जुदा’ करण्याची उघड धमकी देणारी ‘पोस्ट’ ठेवली होती; मात्र ही पोस्ट येथील मुरादपूर मोहल्ला येथील फक्रुद्दीन निसार जुवेकर याने, तसेच अन्य ५ जणांनी त्यांच्या ‘इन्स्टाग्राम’वर ठेवली असल्याचे उघड झाले.

१. याची गंभीर नोंद घेत हिंदुत्वनिष्ठ श्री. विनोद भुरण आणि श्री. अभिनव भुरण यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात जाऊन ही गोष्ट उपविभागीय पोलीस अधिकारी अन् पोलीस निरीक्षक यांच्या निदर्शनास आणून दिली.

२. प्रारंभी पोलीस तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्यास टाळाटाळ करत होते; परंतु हे वृत्त अन्य हिंदुत्वनिष्ठांना समजल्यावर मोठ्या संख्येने ते पोलीस ठाण्यात उपस्थित राहिले आणि संबंधितांवर गुन्हे नोंदवण्याविषयी सांगण्यात आले. हिंदुत्वनिष्ठांनी दबाव निर्माण केल्यानंतर मनसे तालुकाध्यक्ष श्री. अभिनव भुरण यांची तक्रार प्रविष्ट करून घेण्यात आली.

३. यानंतर पोलिसांनी  मुबारक खेरडकर आणि फक्रुद्दीन निसार जुवेकर यांना चौकशीसाठी कह्यात घेतले असल्याचे समजते.

४. या प्रसंगी भाजप जिल्हा उपाध्यक्ष आशिष खातू, युवासेनेचे तालुकाप्रमुख निहार कोवळे, ओंकार नलावडे, भाजप शहराध्यक्ष श्रीराम शिंदे, निनाद आवटे, विश्व हिंदु परिषदेचे पराग ओक, विक्रम जोशी, निखिल किल्लेकर, हिंदु जनजागृती समितीचे सुरेश शिंदे यांच्यासह शहरातील हिंदु युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (हिंदूंनो, तुमचे असे संघटित होणेच, हे हिंदु राष्ट्रासाठीचे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे, हे जाणा ! – संपादक) 

  • धर्मांधांना कायद्याचे भय न राहिल्यामुळे देशात आनंदोत्सव चालू असतांनाही ते अशा धमक्या देण्याइतपत उद्दाम झाले आहेत. धर्मांधांच्या विरोधात कधीही कठोर भूमिका न घेणार्‍या पोलिसांना लज्जास्पद !
  • धर्मांधांच्या विरोधात तक्रार न नोंदवणारे पोलीस भारताचे कि पाकिस्तानचे ? अशा पोलिसांची वरिष्ठांकडे तक्रार नोंदवा !
  • ‘सामाजिक माध्यमांवरून तेढ निर्माण करणार्‍या पोस्ट प्रसारित करू नका’, असे हिंदूंना सांगणारे पोलीस अशा धर्मांधांवर आता कोणती कारवाई करणार ?