Chikmagalur Dattatreya Peetha : चिक्कमगळुरू (कर्नाटक) येथील दत्तपीठामध्ये २२ जानेवारीला रामतारक होम करण्यास प्रशासनाकडून निर्बंध !

चिक्कमगळुरू येथील इनाम दत्तात्रेय पीठ

चिक्कमगळुरू (कर्नाटक) – अयोध्या येथे २२ जानेवारीला श्रीराममंदिरात श्रीरामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असतांना चिक्कमगळुरू येथील इनाम दत्तात्रेय पीठ येथे रामतारक होमाची सिद्धता करण्यात आली होती; परंतु होम करण्यास निर्बंध घालण्यात आले. येथील  यज्ञशाळेला टाळे ठोकण्यात आले आहे. इनाम दत्तात्रेय दर्ग्याच्या समीप यज्ञशाळा असून २२ जानेवारीला विशेष पूजेची सिद्धता करण्यात आली होती; परंतु  शेवटच्या क्षणी जिल्हा प्रशासनाने रामतारक होम करण्यावर निर्बंध घातला असून याविषयी व्यवस्थापन समितीने अप्रसन्नता व्यक्त केली आहे.

संपादकीय भूमिका

कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यापासून हिंदूंना प्रतिदिन अशा प्रकारच्या निर्बंधांना आणि धर्मांधांच्या आक्रमणांना सामोरे जावे लागत आहे. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन कृतीशील होणे आवश्यक आहे !