हिंदूंना श्रीकृष्णजन्मभूमीवर पूजेची अनुमती देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली !

सर्वोच्च न्यायालय

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाने मथुरेतील श्रीकृष्णजन्भूमीचे सरकारीकरण करण्याची, तसेच हिंदूंना श्रीकृष्णजन्भूमीवर पूजा करण्याचा अधिकार देण्याची मागणी करणारी जनहित याचिका  फेटाळून लावली.

११ ऑक्टोबर २०२३ या दिवशीही अलाहाबाद उच्च न्यायालयानेही या मागणीची याचिका फेटाळून लावली होती. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, हे सूत्र आधीपासून उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे एकाहून अधिक खटले चालवण्यात येऊ नयेत.