बरेली (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान तरुणाने हिंदु अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर केला बलात्कार !

बरेली (उत्तरप्रदेश) – येथील शहजाद बेग नावाच्या मुसलमान तरुणाने  अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून तिच्यावर अनेक दिवस बलात्कार केला. एवढेच नाही, तर १० दिवस हिंदु मुलीवर बलात्कार करून तिला अनीस बेग नावाच्या आणखी एका मुसलमान तरुणाकडे सोपवले. या प्रकरणी पोलिसांनी अनीस बेग याला अटक केली आहे.

१. बरेलीच्या पदरतपूर गावात रहाणारी हिंदु अल्पवयीन मुलगी १२वी इयत्तेत शिकत होती. २१ डिसेंबर २०२३ या दिवशी शहजाद बेग याने तिचे अपहरण केले. पीडित मुलीवर १० दिवस बलात्कार करून त्याने तिला अनीस बेग याला १० सहस्र रुपयांना विकली.

२. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी मुलीला अनीस बेग याला शाहजहांपूर येथून कह्यात घेतले. पोलीस शहजादचा शोध घेत आहेत.

३. या प्रकरणातील आरोपीच्या अटकेसाठी करणी सेनेने बरेली येथे निदर्शने केली.

४. पोलिसांनी पीडित अल्पवयीन हिंदु मुलीला तिच्या कुटुंबियांकडे सोपवले आहे.

संपादकीय भूमिका 

अशांच्या विरोधात जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !