पाककडून ड्रोनद्वारे शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थ यांची केली जाते तस्करी !
नवी देहली – पाकिस्तानकडून भारतामध्ये शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थ यांची तस्करी मोठ्या प्रमाणात केली जाते. यासाठी तो ड्रोन्सचाही अधिकाधिक वापर करत असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. त्याच्या ड्रोन्सना नष्ट करण्यासाठी भारताने स्वदेशी ड्रोनविरोधी यंत्रणा विकसित केली आहे. ही यंत्रणा पुढील ६ महिन्यांत कार्यान्वित करण्याच्या सिद्धतेत भारत आहे.
सौजन्य न्यूजएक्स लाईव
भारत ड्रोनविरोधी प्रणालीसाठी तीन प्रकारच्या तंत्रज्ञानांचा अभ्यास करून त्यांची चाचणी करत आहे. या तीनपैकी एक तंत्रज्ञान निवडले जाईल किंवा तिन्हींचे संयोजन केले जाईल.
पाकिस्तानने भारताच्या विरोधात केलेला ड्रोन्सचा वापर !
१. पाकिस्तान जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थान राज्यांत ड्रोनद्वारे शस्त्रे, दारूगोळा अन् अमली पदार्थ पोचवतो.
२. २९ डिसेंबर या दिवशी पंजाबमधील गुरुदासपूर येथे सापडले होते पाकिस्तानी ड्रोन
३. २० डिसेंबर या दिवशी पंजाबमधील तरनतारन येथे पोलीस आणि सीमा सुरक्षा दलाचे कर्मचारी यांनी ड्रोनसह २ किलो ५०० ग्रॅम हेरॉईन केले होते जप्त
४. १ नोव्हेंबर २०२२ ते ३१ ऑक्टोबर २०२३ या १ वर्षाच्या कालावधीत सुरक्षादलांनी ९० ड्रोन जप्त केले. त्यांपैकी ८१ पंजाबमध्ये आणि ९ राजस्थानमध्ये सापडले. गेल्या वर्षभरात ड्रोन दिसण्याची संख्या ३००-४०० झाली आहे.
भारताची स्वदेशी बनावटीची ‘डी ४ ड्रोन’ यंत्रणा !
भारताकडे ‘ड्रोन डिटेक्ट, डेटर आणि डिस्ट्रॉय’ म्हणजेच ‘डी ४’ नावाची ड्रोन यंत्रणा आहे. ही पहिली स्वदेशी ड्रोनविरोधी यंत्रणा आहे, जी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (‘डी.आर्.डी.ओ.’ने) ३ वर्षांत विकसित केली आहे. ‘डी ४’ ड्रोन हवेत ३ किमीच्या परिघात शत्रूचा शोध घेते, तसेच त्यासाठी ३६० अंश विस्तार प्रदान करते. याद्वारे शत्रूचा (ड्रोनचा) वेध घेऊन त्याला नष्ट केले जाते.
संपादकीय भूमिकाभारताला अस्थिर करण्यासाठी पाक विविध तंत्रज्ञानांचा वापर करते. या तंत्रज्ञानाला शह देण्यासाठी भारताकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहेच; परंतु मुळात आतंकवादाच्या निर्मात्या पाकला नष्ट करणे अधिक आवश्यक आहे, हे लक्षात घेतले पाहिजे ! |