मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अपशब्द वापरल्याचे प्रकरण !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात अपमानास्पद शब्द वापरल्याच्या प्रकरणी पोलिसांनी महंमद वसीम याला नुकतीच अटक केली. मसुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजीव कुमार यांनी वसीम याच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता.
१. वसीम हा मेरठचा रहिवासी आहे; परंतु मसुरी येथे भाड्याच्या घरात राहून तो प्लास्टिकच्या खुर्च्या विकण्याचे काम करत होता.
२. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात अपमानास्पद शब्द वापरल्याचा वसीमचा व्हिडिओ सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित झाला होता.
३. व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री योगी यांच्याविषयी वसीम म्हणतो, ‘आम्ही मुसलमान आहोत, आम्हाला ते संपवणार का ? त्यांच्या नव्वद पिढ्याही आम्हाला नष्ट करू शकत नाहीत. ते आकाशातून आले आहेत का ? ’
४. ‘योगी सरकारच्या काळात गुंडगिरी संपली नाही का ?’, असा प्रश्न मुलाखात घेणार्याने विचारला असता वसीम रागाने म्हणाला, ‘योगी स्वत: गुंड आहे.’
संपादकीय भूमिका
|