|
राजापूर – शहरालगतच्या धोपेश्वर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पन्हळे तर्फे राजापूर गावामध्ये चालू असलेला अनधिकृत मदरसा बंद करावा, असा ठराव ग्रामसभेमध्ये बहुमताने पारित झालेला असतांनाही २ महिने उलटून गेले, तरी अद्याप यावर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. हा अनधिकृत मदरसा तात्काळ बंद न केल्यास २६ जानेवारीपासून आमरण उपोषण करण्याचा चेतावणी स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे. याविषयीचे निवेदन धोपेश्वर ग्रामपंचायत प्रशासनाला देण्यात आले असून येथील प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनाही निवेदन देणार असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली.
१. ग्रामपंचायत प्रशासनाची कोणतीही अनुमती न घेता पन्हळे तर्फे राजापूर येथे एका शेतघरामध्ये मदरसा चालू करण्यात आला आहे. या मदरशामधील मुलांचा गावात राजरोसपणे वावर चालू झाल्याने ग्रामस्थांनी याविषयी तक्रार केली होती.
२. ७ नोव्हेंबर २०२३ या दिवशीच्या ग्रामसभेमध्ये या विषयावर चर्चा करण्यात आली. या वेळी ग्रामस्थांनी या अनधिकृत मदरशाला तीव्र विरोध दर्शवत तो बंद करण्याचा ठराव बहुमताने संमत केला.
३. ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधित शेतघर मालकाला १५ दिवसांमध्ये कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आदेश दिले होते; मात्र दिलेल्या मुदतीत मालकाने कोणतीही कागदपत्रे सादर केलेली नाहीत, तरीही या मदरशावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
४. मदरशातील तरुण मुलांची भाषा वेगळी असून ही मुले नेमकी परराज्यातील आहेत की, अन्य कुठली? याविषयी ग्रामस्थ अनभिज्ञ आहेत.
५. या मदरशामध्ये रहाणार्या मुलांचा गावामध्ये स्वैरपणे वावर असल्याने गावातील माता- भगिनींना असुरक्षितता वाटत आहे, तसेच गावातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
६. याविषयी पोलीस प्रशासनालाही माहिती देण्यात आली असतांनाही पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेतलेली नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
संपादकीय भूमिका‘अनधिकृत मदरसा बंद करा’, अशी मागणी प्रशासनाकडे का करावी लागते ? खरेतर प्रशासनाने स्वत:हून यावर कारवाई करणे अपेक्षित ! |