|
ओटावा (कॅनडा) – कॅनडामध्ये खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येच्या प्रकरणी कॅनडातील रॉयल कॅनेडियन माऊंटेड पोलिसांनी २ आरोपींची ओळख पटवली आहे. पुढील काही आठवड्यांत त्यांना अटक होऊ शकते, असे म्हटले जात आहे. ‘हे दोन्ही आरोपी अद्यापही कॅनडातच आहेत’, असे वृत्त कॅनडातील ‘ग्लोब अँड मेल’ या नियतकालिकाने दिले आहे.
१. या वृत्तात म्हटले आहे की, दोन्ही आरोपींवर आरोपपत्र प्रविष्ट झाल्यानंतर यात भारताच्या भूमिकेची माहिती उघड होऊ शकते. गेल्या ६ मासांपासून पोलीस या दोघांवर लक्ष ठेवून आहेत.
२. या हत्येच्या संदर्भात भारताने आधीच स्पष्ट केले आहे की, कॅनडाने भारतावर केलेल्या आरोपांचे पुरावे सादर केले, तर भारत यादृष्टीने कारवाई करू शकेल; मात्र कॅनडाने अद्याप कोणतेही पुरावे भारताला दिलेले नाहीत.