पुणे येथील कु. सहर्षा मुदकुडे (वय १७ वर्षे) हिची तिच्या आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१. दळणवळण बंदीच्या काळात व्यष्टी साधनेसंदर्भात गांभीर्य निर्माण होणे

कु. सहर्षा मुदकुडे

‘माझी मुलगी कु. सहर्षा सचिन मुदकुडे (वय १७ वर्षे) सध्या अकरावीमध्ये शिकत आहे. दळणवळण बंदीच्या काळापासून कु. सहर्षामध्ये व्यष्टी साधनेचे गांभीर्य निर्माण होऊन ती व्यष्टी साधनेसाठी प्रयत्न करत आहे.

२. मैत्रिणींच्या अयोग्य वागण्याकडे साक्षीभावाने पाहून श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न करणे

शाळेत असल्यापासून आणि आता महाविद्यालयात असतांनाही ती मैत्रिणींच्या वागण्याचा स्वतःवर परिणाम करून घेत नाही. ती नेहमी मैत्रिणींमधील गुण पहाते. त्या अनावश्यक बोलत असतील, तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करून ती श्रीकृष्ण आणि प.पू. गुरुदेवांच्या अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न करते.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे ‘योग्य आचरण कसे असायला हवे ?’, हे समजल्याने त्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटणे

सौ. सारिका मुदकुडे

काही मुली आई-वडिलांना फसवून भ्रमणभाषचा गैरवापर करणे, वेगळे कारण सांगून बाहेर फिरायला जाणे, मुलांशी संपर्क करणे, खोटे बोलणे, असे अयोग्य वर्तन करतात; परंतु प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळे ‘योग्य आचरण कसे असायला हवे ?’, हे कु. सहर्षाला समजले’, याविषयी तिला पुष्कळ कृतज्ञता वाटते.

४. मैत्रिणींना सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ, वह्या, तसेच पाश्चात्त्यांचे अंधानुकरण न करता धर्माचरण केल्याने होणारे लाभ यांचे महत्त्व सांगणे

ती मैत्रिणींना सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ग्रंथांचे आणि सनातन वहीचे महत्त्व सांगते. त्याचप्रमाणे पाश्चात्त्य पद्धतीच्या परंपरा न जपणे, उदा. कोणतेही ‘डेज’ (पाश्चात्त्य साजरे करत असलेले निरनिराळे दिवस) साजरे न करणे, तिथीनुसार वाढदिवस साजरा करणे, इत्यादींविषयी त्यांना सांगून त्यांचे प्रबोधन करते.

५. जिल्ह्यातील बालसाधकांचा व्यष्टी आढावा घेण्यासमवेत स्वतःतील स्वभावदोष घालवण्यासाठीही प्रयत्न करणे

सध्या ती पुणे जिल्ह्यातील बालसाधकांचा व्यष्टी आढावा घेण्याची सेवा करत आहे. ती दिवसभरात तिच्याकडून झालेल्या चुका मला विचारते. ‘उद्धटपणा’ या स्वभावदोषामुळे स्वतःकडून तसे बोलणे झाल्यास क्षमायाचना करणे, नम्रतेने बोलणे इत्यादी प्रयत्न ती करत आहे.

६. सत्‌मध्ये रहाण्याचा प्रयत्न करणे

पूर्वी तिला दूरदर्शन बघायची सवय होती. आता तिने ‘ऑनलाईन’ साधना सत्संग ऐकणे, दैनिक वाचन करणे, चर्चासत्रे ऐकणे, असे प्रयत्न चालू केले आहेत. रामनाथी आश्रमात युवा शिबिरासाठी जाऊन आल्यानंतर तिच्यामध्ये सतर्कता वाढली असून, तिचा सत्‌मध्ये रहाण्याचा भागही वाढला आहे. ‘तिने पूर्णवेळ साधना करावी’, असेही तिला वाटत आहे.

७. महाविद्यालयात असतांना भावावस्थेत रहाण्यासाठी करत असलेले प्रयत्न

अ. बसमधून येता-जाता नामजप करणे

आ. बसमधून जातांना ‘मी श्रीकृष्णाच्या रथातून चालले आहे. वाहनचालक श्रीकृष्ण आहे. त्यामुळे माझ्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होत आहेत’, असा भाव ठेवणे.

इ. महाविद्यालयात प्रवेश करतांना ‘रामनाथी आश्रमातील गुरुदेवांच्या खोलीमध्ये जात आहे’, असा भाव ठेवणे.

ई. ‘वर्गामध्ये समोर बसलेल्या वर्गशिक्षिका नसून, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आहेत आणि त्या शिकवत आहेत’, असे वेगवेगळे भावजागृतीचे प्रयत्न ती करते. अन्य कुठे वेळ घालवण्यापेक्षा व्यष्टी आणि समष्टी साधना करण्याकडे तिचे लक्ष असते.

स्वभावदोष

उद्धटपणा, ऐकण्याची वृत्ती नसणे, प्रतिमा जपणे.’

– सौ. सारिका सचिन मुदकुडे (कु. सहर्षाची आई), सिंहगड रस्ता, पुणे. (५.९.२०२२)