Anti-National Teacher : देवरिया (उत्तरप्रदेश) येथील शाळेत ‘जय हिंद’ म्हटल्याने एका शिक्षकाला ३ शिक्षकांकडून मारहाण !

या ३ शिक्षकांनी मिळून एक शिक्षकाला मारहाण केली

देवरिया (उत्तरप्रदेश) : येथील कंपोजिट विद्यालयामध्ये ‘जय हिंद’ म्हटल्यामुळे झालेल्या वादातून ३ शिक्षकांनी मिळून एक शिक्षकाला मारहाण केली. या घटनेत शाळेत गोंधळ उडला आणि विद्यार्थ्यांमध्ये चेंगराचेंगरी झाली. यात एक विद्यार्थिनी गंभीररित्या घायाळ झाली. २३ डिसेंबरला प्रार्थनेच्या वेळी ‘जय हिंद’ म्हटल्यावरून ही घटना घडली.

या प्रकरणी ४ साहाय्यक शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे, तर मुख्याध्यापक आणि अन्य एक साहाय्य शिक्षक यांना चेतावणी देण्यात आली आहे. मार खाणारे आणि मारणारे सर्व शिक्षक हिंदु आहेत.

संपादकीय भूमिका

अशा  शिक्षकांना अटक करून कारागृहात डांबले पाहिजे !