शहरी नक्षलवादाचा धोका ओळखून हिंदूंनी कृतीशील होणे आवश्यक ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

पट्टणकुडी (जिल्हा बेळगाव) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी २२५ धर्मप्रेमींची उपस्थिती

पट्टणकुडी (जिल्हा बेळगाव) – ‘देहली येथे झालेले शेतकरी आंदोलन असो, नागरिकत्व सुधारणा कायद्याविरुद्धचे आंदोलन असो, जवाहरलाल नेहरू विद्यापिठात दिल्या गेलेल्या भारतविरोधी घोषणा असोत किंवा सामाजिक माध्यमांवर हिंदूंच्या सण-उत्सवांविषयी केला जाणारा अपप्रचार असो; यामागे शहरी नक्षलवादी आहेत. हा धोका ओळखून आणि वैचारिक संघर्षासाठी हिंदूंना कृतीशील व्हावे लागेल, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी केले. ते १७ डिसेंबर या दिवशी पट्टणकुडी येथे आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलत होते. याचा लाभ २२५ धर्मप्रेमींनी घेतला.

या प्रसंगी सनातन संस्थेच्या श्रीमती (डॉ.) शिल्पा कोठावळे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. श्री. किरण दुसे यांचा सत्कार धर्मप्रेमी श्री. सुरेश माने यांनी केला, तर डॉ. (श्रीमती) शिल्पा कोठावळे यांचा सत्कार सौ. शारदा पुणेकर यांनी केला.

सहकार्य

श्रीमती अर्पिता उपाध्ये यांनी या सभेसाठी सभागृह उपलब्ध करून दिले, तर पट्टणकुडी येथील धर्मप्रेमी श्री. भरतेश सुलतान्नावर यांनी या सभेसाठी ध्वनीयंत्रणा उपलब्ध करून दिली. धर्मप्रेमी श्री. सोमशेखर सरवडे आणि सौ. शारदा पुणेकर यांनी कार्यकर्त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली. त्यासाठी समितीने त्यांचे आभार मानले.


मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) – लोहारवाडी (करुंगळे) येथे १६ डिसेंबरला झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे आणि सनातन संस्थेच्या डॉ. (श्रीमती) शिल्पा कोठावळे यांनी संबोधित केले. या वेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष

श्री. एन्.बी. पाटील, सरपंच श्री. माधव कळंत्रे, पोलीस पाटील सौ. शीला वीर, ‘गणेश तरुण मंडळा’चे अध्यक्ष श्री. संजय लोहार, श्री. उदयसिंह देसाई (सरकार), सर्वश्री सुनील लोहार, चंद्रकांत लोहार, अभिजित लोहार, उमाजी लोहार, अशोक कुंभार, भरत पाटील यांसह हिंदु बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पट्टणकुडी येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी उपस्थित धर्मप्रेमी, जिज्ञासू