काँग्रेसकडून भाजपवर टीका
भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील नव्या भाजप सरकारच्या पहिल्या विधानसभा अधिवेशनाच्या वेळी सभागृहात असलेले जवाहरलाल नेहरू यांचे तैलचित्र हटवून तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र लावण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्षांच्या आसनामागे म. गांधी आणि नेहरू अशी २ तैलचित्रे होती. त्यांतील नेहरू यांचे तैलचित्र हटवण्यात आले आहे. यावरून काँग्रेसने भाजप सरकारवर टीका केली आहे.
सौजन्य न्यूज 18 इंडिया
काँग्रेसचे प्रवक्ते अब्बास हफीज म्हणाले की, भाजपला देशाचा इतिहास पुसून टाकायचा आहे. त्यामुळेच ते अशी कृती करत आहेत. यावरून ‘भाजपची मानसिकता काय आहे ?’ हे दिसून येते. नेहरूंचे तैलचित्र पुन्हा होते त्याच जागी लावावे अन्यथा आम्ही ते लावू, अशी चेतावणीही त्यांनी या वेळी दिली.