‘दळणवळण बंदीपासून चालू झालेल्या ‘ऑनलाईन’ साधना सत्संगा’ला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या सत्संगांच्या माध्यमातून जिज्ञासूंचे साधनेचे प्रयत्न चालू झाले. काही जिज्ञासू आता दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करणे, धर्मशिक्षणाविषयीचे फलक लेखन करणे, अर्पण गोळा करणे, ओळखीच्या लोकांना सनातनच्या सत्संगांच्या ‘लिंक’ पाठवणे, सनातनचे ग्रंथ आणि उत्पादने यांचे वितरण करणे, अशा विविध सेवांमध्ये सहभागी होत आहेत. काही जिज्ञासूंनी व्यष्टी आणि समष्टी साधनेचे चांगले प्रयत्न करून आध्यात्मिक पातळीही गाठली आहे.
१६.१०.२०२२ या दिवशी चिंचवड येथील साधना सत्संगातील जिज्ञासूंनी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली. त्या वेळी आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. ‘आश्रमात आसंदीवर एक साधक बसले होते. त्यांना पाहिल्यावर ‘गुरुदेवच माझ्याकडे पहात आहेत’, असे वाटून मला पुष्कळ आनंद झाला.’ – सौ. चारुता माहूरकर
२. ‘आश्रमातील पाणी पितांना ‘तीर्थ पीत आहे’, असे मला वाटत होते.’ – श्रीमती नीलम कुलकर्णी
३. ‘आश्रमातील वातावरणात शांतता आणि चैतन्य होते. त्यामुळे ‘घरी येऊ नये आणि आश्रमातच रहावे’, असे वाटत होते.’ – सौ. सुरेखा तापकीर
४. ‘आश्रमात असतांना थोडा वेळही घरचा विचार मनात आला नाही किंवा ताण जाणवला नाही. ‘आपण आनंद, शांती आणि भक्ती असणार्या विश्वात आहोत’, असे वाटत होते.’ – सौ. रसिका जोशी
५. ‘आश्रमात पूर्ण दिवस व्यष्टी साधनेचे प्रयत्न चांगले झाले.’ – सौ. रीमा देशपांडे
६. ‘आश्रमात आम्हाला सद्गुरु स्वाती खाडये यांच्या सन्मान सोहळ्याची ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली. तेव्हा ती पहातांना माझी भावजागृती झाली. ‘सद्गुरु ताई किती तळमळीने साधना करतात’, हे शिकायला मिळाले. सद्गुरु ताईंचे ‘गुरुदेवांना आनंद मिळेल, असे प्रयत्न आपण कृतीच्या स्तरावर केले पाहिजेत’, हे वाक्य अंतर्मनापर्यंत गेले.’ – सौ. रीमा देशपांडे
७. ‘दुसर्या दिवशी माझा मुलगा मला म्हणाला, ‘‘आई, तुझा चेहरा छान दिसत आहे. चेहर्यावर तेज आल्यासारखे वाटत आहे.’’ – श्रीमती नीलम कुलकर्णी
८. ‘दुसर्या दिवशी शेजारच्या मैत्रिणी मला म्हणाल्या, ‘‘तू पुष्कळ ताजीतवानी दिसत आहेस.’’ तेव्हा ‘आश्रमातील चैतन्यामुळे माझ्यावरील सर्व आवरण नष्ट झाले’, असे मला वाटले.’ – सौ. रसिका जोशी
९. ‘आश्रमातील एका साधिकेने मला सांगितले, ‘‘गुरुकृपेचा ओघ असल्याविना आश्रमात येता येत नाही. अनेक जण दारातूनच परत जातात.’’ हे ऐकून डोळ्यांतून आनंदाश्रू आले. तेव्हा जाणवले की, माझे आणि माझ्या मुलीचे प्रारब्ध अल्प करण्यासाठीच गुरुमाऊलीने आम्हाला आश्रमात बोलावून घेतले.’ – सौ. चारुता माहूरकर
आश्रम पाहिल्यावर जिज्ञासूंनी कृतीच्या स्तरावर चालू केलेले प्रयत्न
अ. ‘आश्रमातून घरी आल्यापासून मी चुका लिहिण्यास आणि प्रत्येक १ घंट्याने प्रार्थना अन् कृतज्ञता व्यक्त करायला आरंभ केला.’ – सौ. शैलजा रसाळ
आ. ‘स्वयंपाकघरातील धान्य साठवण्यामधील व्यवस्थितपणा पाहून घरातील स्वयंपाकघरही तसे व्यवस्थित ठेवण्यासाठी गुरुकृपेने प्रयत्न चालू केले आहेत.’ – सौ. चारूता माहूरकर
इ. ‘आश्रमात सनातन संस्था करत असलेल्या हिंदु धर्मजागृती, राष्ट्ररक्षण आणि धर्मशिक्षण या कार्यांची माहिती मिळाली. यापुढे अधिकाधिक लोकांना संस्थेच्या कार्याची ओळख करून देणार आहे. व्यष्टी साधनेचे सत्संग आणि अन्य सेवा यांमध्ये सहभागी होऊन स्वतःच्या जीवनात पालट घडवून प्रगती करीन.’
– श्री. अशोक आवारे
४. सर्वांनी व्यक्त केलेली कृतज्ञता
‘गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) आम्हाला आश्रमदर्शनाची संधी दिली, त्याबद्दल त्यांच्या श्री चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सुश्री (कु.) उज्ज्वला ढवळे (२९.१०.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |