PMO Officer Arrest : पंतप्रधान कार्यालयाचा अधिकारी असल्याचा दावा करणार्‍या सय्यद बुखारी याला अटक !

  • डॉक्टर बनून ६-७ मुलींशी केला विवाह !

  • पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचाही संशय !

सय्यद इशान बुखारी

भुवनेश्‍वर (ओडिशा) – ओडिशा पोलिसांच्या विशेष कृती दलाने जाजपूर जिल्ह्यातून सय्यद इशान बुखारी नावाच्या एका काश्मिरी मुसलमानाला अटक केली आहे. तो कधी स्वत:ला पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी, तर कधी भारतीय सैन्यातील वैद्यकीय अधिकारी, कधी ‘न्यूरो सर्जन’, तर कधी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अधिकार्‍यांच्या जवळचा असल्याचे सांगून लोकांची फसवणूक करत असे. त्याचे पाकिस्तानातील अनेक संशयित लोकांशी संपर्क आहेत. यामुळे तो पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचाही संशय आहे. त्याच्याविरुद्ध अनेक पुरावेही सापडले आहेत.

१. सय्यद इशान बुखारी उपाख्य इशान बुखारी उपाख्य डॉ. इशान बुखारी असे या तरुणाचे नाव आहे. तो काश्मीरमधील कुपवाडा येथील रहिवासी आहे. वर्ष २०१८ पासून तो ओडिशात रहातो.

२. सय्यदने त्याची ओळख पालटून काश्मीर, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र आणि ओडिशा यांसह भारतातील अनेक राज्यांमध्ये अनुमाने ६-७ मुलींशी लग्न केले. त्याचे अनेक मुलींसमवेत संबंधही असल्याचे पोलिसांनी सांगितले.

३. या तरुणाने अनेक आंतरराष्ट्रीय विद्यापिठांमधून वैद्यकीय पदव्या घेतल्या आहेत. ओडिशाचे पोलीस महानिरीक्षक जय नारायण पंकज यांनी सांगितले की, सय्यदकडून अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठ, कॅनडाच्या आरोग्य सेवा संस्था आणि इतर विद्यापिठांनी दिलेल्या वैद्यकीय पदव्या जप्त करण्यात आल्या आहेत.

४. याखेरीज ४ भ्रमणभाष, अनेक ओळखपत्रे आणि कोरे धनादेश यांसह अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

संपादकीय भूमिका

  • एवढी वर्षे लोकांची फसवणूक करत असूनही असे लोक कायद्याच्या कचाट्यात अडकू न शकणे, यातून कायदा-सुव्यवस्था ही अधिक कणखर होण्याची आवश्यकता आहे, हेच लक्षात येते !
  • भारतात अल्पसंख्य असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !